अहमदनगर दि.३० जुलै
घर घर लंगर सेवाच्या वतीने लांबून शाळेत पायी जाणाऱ्या शहर व शहरालगत असलेल्या सतरा शाळांमधील एकशे अकरा गरजू मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. गुरुद्वारा भाई दयासिंहजी गोविंदपूरा येथे सायकल बँक या सामाजिक उपक्रमाद्वारे सायकल वितरणाचा सोहळा पार पडला. शहरातील सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईड दरम्यान शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सायकलसाठी निधी जमा करण्यात आला होता. हा निधी व विविध सामाजिक संघटना व मित्र परिवाराच्या माध्यमातून सायकल बँकचा प्रकल्प राबविण्यात आला.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व शिर्डीचे विभागीय पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते शालेय मुलींना या सायकलीचे वितरण करण्यात आले.लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, डॉ. सिमरनकौर वधवा, आय लव्ह नगरचे कार्तिक नायर, अमित बुरा, हरिश हरवानी, इनरव्हील व्हिनस क्लबच्या अर्पिता शिंगवी, लिओ क्लबच्या अध्यक्षा आंचल कंत्रोड, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट 91 बॅचचे भूषण कर्णावट, 89 बॅचचे डॉ. संजय असनानी आदी उपस्थित होते.