अहमदनगर दि .३० जुलै
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहरम विसर्जन मिरवणुक शांतेत पार पडली शनिवारी दुपारी शहरातील कोठला आणि मंगलगेट हवेली येथून प्रारंभ झाला. या हुसेन, या हुसेन अशा घोषणा…देत अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. संपूर्ण नगर शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा सवारी पहण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. ताबूत सवारी सोबत आणि मिरवणुक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
कोठला येथून छोटे इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. कोठला परिसरात ही सवारी खेळविण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी कोठला परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सवारीवर फुलांची चादर तसेच नवसाचे मोरचंद सवारीला लावण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती. मंगलगेट हवेली येथून दुपारनंतर मोठे इमाम हसन यांची सवारी मार्गस्थ झाली मात्र ही मिरवणूक या भागात बराच काळ रेंगाळ होती. महानगरपालिकेपर्यंत सायंकाळी सातच्या दरम्यान सवारी पोहचली होती तर बरोबर सात वाजून 57 मिनिटाच्या ठोक्याला सवारी दिल्लीगेट बाहेर पडली.
या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर उपअधीक्षक खैरे पोलीस उपाधीक्षक कातकडे यांचे सह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या सह पोलीस कर्मचारी आणि आरसीबी पथक तैनात करण्यात आले होते. ही मिरवणूक कोठला येथून निघून – फलटण पोलीस
चौकी- मंगलगेट हवेली- आडते बाजार-पिंजार
गल्ली- पारशा खुंट- जुना कापड बाजार- देवेंद्र
हॉटेल – खिस्त गल्ली- पंचपीर चावडी – जुनी
महानगरपालिका- कोर्टाची मागील बाजू – चौपाटी
कारंजा- दिल्लीगेट- निलक्रांती चौक-बालिकाश्रम
रोड- सावेडी गांव येथे रात्री साडेनऊ वाजता विसर्जन स्थळी पोचली होती.
जुन्या महापालिकेपासून या सवारीला पुढे जाण्याचा चांगला वेग आला होता तोफखाना पोलीस स्टेशन आणि कोतवाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जुन्या महानगरपालिकेपासून सवारीला मागे येण्याची संधी दिली नाही त्यामुळे ही सवारी शांततेत दिल्ली गेट बाहेर पडली.