Home क्राईम टिंग्याची दहशद कोयत्याने नगरसेवकाच्या मुलाला मारहाण करून लुटले

टिंग्याची दहशद कोयत्याने नगरसेवकाच्या मुलाला मारहाण करून लुटले

अहमदनगर दि.४ ऑक्टोबर

नगर शहरातील सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ सुमेध किशोर साळवे आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी सिध्दार्थ बोरुडे व त्यांच्या हॉटेलवरील वॉचमनला सोमवारी रात्री दुचाकीवरून जात असताना पावणे बारा वाजेच्या सुमारास निलक्रांती चौक येथे मारहाण करून गळ्यातील आठ तोळ्याची सोन्याची चेन ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र या गडबडीत गाडीवरून तोल गेल्याने दोघेही पळत असताना टिंग्या आणि त्याच्या साथीदारांनी मागून कोयत्याने वार केल्याची घटना निलक्रांती चौकात घडली आहे.(ahmednager crime)

या प्रकरणी जखमी सिध्दार्थ संदीप बोरुडे (वय 18
रा. बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार तोफखाना पोलीस ठाण्यात टिंग्या ऊर्फ सुमेध किशोर साळवे आणि इतर तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आठ तोळे वजनाची सोन्याची चेन व 15 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चौघांनी लुटला असल्याची फिर्याद नोंदवण्यात आल्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी,(Assistant Police Inspector Vishwas Bhansi) उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. गुन्हेगार टिंग्या साळवेला रात्रीतून ताब्यात घेत अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे (Assistant Police Inspector Nitin Ranadive.)करीत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version