Home विशेष कृष्णगंगा साडी या भव्य दालनाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

कृष्णगंगा साडी या भव्य दालनाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर 2ऑक्टोबर

नगर शहरातील गुलमोहर रोड वरील कृष्णगंगा साडी या दालनाचा शुभारंभ नुकताच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप,शिवसेना शहरप्रमुख संभाजीराजे कदम, भुपेन्द परदेशी, तहसीलदार आंधळे मॅडम, समाजसेविका माधुरीताई शिरसाठ, प्रदुषण अधिकारी स्मिता वनवे, नगरसेवक रामदास आंधळे, डॉ. नागरगोजे इ. मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.

गुलमोहर रोडवरील पारिजात चौक या परिसरात असणाऱ्या अनिल सानप यांच्या  कृष्णगंगा गारमेंट्स या वस्त्र दालनाच्या 19 वर्षाच्या यशस्वी वाटचाली नंतर आता कृष्णगंगा साडी या नवीन दालनाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
कृष्णगंगा या दालनात साड्यांची गुणवत्ता चांगली असून साड्यांचे डिझाईन अत्यंत आकर्षक आहेत सिल्क, कॉटन, ऑरगांझा, पैठणी, पेशवाई, पटोला, कोटा, बनारसी, मलमल असे प्रकार तसेच नऊवार, पेटीकोट, रेडिमेड ब्लाउजेस, बेडशिट,सतरंजी, लेडीज पर्सेस इ. प्रकार या दालनात अत्यंत वाजवी दरात ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत

कोणत्याही व्यवसायामध्ये चिकाटी आणि ग्राहकाचे हित आणि तो संतुष्ट होईल अशी सेवा दिली तर कोणताही व्यवसाय हा अल्पावधीतच मार्केट मध्ये आपले नाव कमवत असतो आणि यामुळेच त्या व्यवसायिकाची भरभराट होते. आणि ग्राहकांना अजून काही चांगल्या सेवा देतील का याचाच विचार ते व्यवसायिक करत असतो. त्याचप्रमाणे सुरुवातीला कृष्णगंगा या वस्त्र दालनाच्या माध्यमातून अनिल सानप आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ग्राहकांना जी सेवा दिली त्यामुळे आज ते वस्त्रदालनाचा क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.त्यामुळे आता महिलांसाठीच्या कृष्णगंगा साडी या दालनाच्या माध्यमातून महिला ग्राहकांना या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या साड्या मिळतील सावेडी उपनगर सारख्या परिसरात अनेक उद्योगांचे मार्केट वाढत आहे. या परिसरातील उद्योगधंदे वाढत असल्यामुळे आणि एक नवीन मार्केट उपनगरात नगरकरांसाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काही उद्योग अनिल सानप यांनी सुरू करावेत अशा शुभेच्छा यावेळी बोलताना आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी दिल्या.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version