अहमदनगर दि.१७ मार्च
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने सिंधी साहित्याच्या उन्नतीसाठी राज्यात सिंधी साहित्य अकादमीची पुनःस्थापना केली असून त्यावर अशासकीय सदस्यपदी नगरच्या सिंधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते दामोदर बठेजा यांची दुसऱ्यांदा नियुक्ती केली आहे. पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाचे उपसचिव विलास थोरात यांच्या सहीचे नियुक्तीपत्र नुकतेच बठेजा यांना प्राप्त झाले आहे. या अकादमीचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष असलेल्या या समितीचा या समितीवर नगर जिल्ह्यातून निवड होणारे दामोदर बठेजा हे एकमेव सदस्य आहेत.
दामोदर बठेजा यांचे राजकीय कार्यासोबतच सामाजिक कार्य ही मोठे असून शैक्षणिक क्षेत्रातही शैक्षणिक क्षेत्राचे उन्नती करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. सिंधी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी नेहमीच अग्रेसर असलेले दामोदर बठेजा यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.