HomeUncategorizedअहमदनगर शहराची शांतता भंग करण्याचा विडा कोणी उचलंलाय का? जातीय दंगली मधील...

अहमदनगर शहराची शांतता भंग करण्याचा विडा कोणी उचलंलाय का? जातीय दंगली मधील इतिहास बाहेर काढा कोणत्या नेत्यांच्या मुलांची नावे आहेत का तपासून पहा सर्वसामान्य जनतेच्या घरातील तरुणांनी किती तुरुंगात जायचं नागरकरांनो आपल्याला शांतता प्रस्थापित करायचीय!

advertisement

अहमदनगर दि.१७ मार्च (सुथो)
अहमदनगर जिल्ह्याचे बरेचसे प्रश्न हे अहमदनगर जिल्हा बाहेरील लोकप्रतिनिधी मांडत असल्याने नेमकं यामागचं इंगित काय हे समजायला काही तयार नाही. मात्र त्यांनी प्रश्न मांडल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात त्याचे काय परिणाम होतात याबाबत त्यांनीही काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत मग तो विषय नामांतराचा असो अथवा अहमदनगर शहरातील हिंदू मुस्लिम गटातील वाद असो याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसतील आणि त्याच प्रश्नांवर बाहेरील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आवाज उठत असतील तर याला असं समजायचं का की बाहेरील जिल्ह्यातील लोकांना अहमदनगर शहरात शांतता राखायची नसेल असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

अहमदनगर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून या शहराची ओळख आहे अनेक इतिहास या शहराने पाहिले आहेत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये इंग्रजांच्या काळात बंदीवासात होते अत्यंत शांतता प्रिय आणि फकीरांची वस्ती म्हणून अहमदनगर शहराची ओळख आहे तर दुसरीकडे राज्यामध्ये सहकाराचा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील प्रवारानगर येथे सुरू झाला होता त्यानंतर राज्याला नव्हे तर देशाला दिशा देण्यासाठी सहकाराच्या बाबतीत अनेक निर्णय अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाले आहेत. मग आता या जिल्ह्याच्या नामांतराबाबत असेल किंवा नगर शहरातील भांडणा विषयी असेल या दोन्हीही गोष्टीला कोण जबाबदार यापेक्षा यामध्ये जो कोणी खरा दोष असेल त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे मात्र विनाकारण दोन समाजात वाद निर्माण होईल असे वक्तव्य करून अहमदनगर शहराची शांतता धोक्यात आणण्याचं काम कोणी करत असेल तर हे नगरकर म्हणून कोणीही खपून घेणार नाही. कारण एखादी घटना घडली तर याचा परिणाम थेट रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यापासून तर करोड रुपये घालून मॉल उभारणाऱ्या उद्योजकापर्यंत सर्वांनाच बसत असतो. मात्र जास्त होरपळत असतो तो हातावर पोट असणारा कष्टकरी मजूर दुकानदार!

बाह्य शक्तींना अहमदनगर शहरासाठी काही करायची गरजच वाटत असेल तर निश्चितच त्यांनी विकासाबाबत जर काही भूमिका घेतली तर नगरकर त्यांच्या मागे उभे राहतील मात्र हिंदू मुस्लिम किंवा नामांतर याबाबत बाहेरच्या लोकांनी नगरमध्ये येऊन चर्चा करून विनाकारण शहराचे वातावरण दूषित करू नये ही सर्वसामान्य नगरकरांची इच्छा आहे. अहमदनगर मध्ये अनेक मातब्बर लोक आहेत जे या प्रश्नाबाबत आपले ताकद पणाला लावून ते काम तडीस नेतीलच. नामांतराबाबत अहमदनगर जिल्ह्यात अनेक मोठमोठे नेते आहेत सर्वच पक्षाचे नेते सुद्धा याबाबत मौन धरून आहेत. मात्र बाहेरील शक्ती नामांतरासाठी आग्रही का? तसेच अहमदनगर शहरात झालेल्या भांडणानंतर सध्या शांतता आहे मात्र थेट विधानसभेत याबाबत चर्चा करून पुन्हा एकदा नगर शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न तर नाही ना? त्यामुळे या अशा बाह्यशक्तींना नगरकरांनी वेळच रोखणे गरजेचे आहे.

निश्चितच ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाबत पोलिसांनी जी योग्य ती कारवाई करायला पाहिजे ती करणे गरजेचे आहे. दोषी कुणीही असो मात्र त्यावर कठोर कारवाई करायलाच हवी.मात्र हिंदू मुस्लिम असे नाव देऊन नगर शहराचे वातावरण दूषित करू नका कारण भविष्य या हिंदू मुस्लिम वर नाही तर आपल्या रोजंदारीवर शिक्षणावर अवलंबून असल्याने या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. आज पर्यंत हिंदू मुस्लिम असतील किंवा जातीय दंगली झाल्या असतील त्या दंगलींमध्ये कोणत्याही एका राजकीय बड्या नेत्यांचे नाव असेल तर दाखवून द्या अथवा त्यांच्या घरातील कोणच्या मुलाचे नातेवाईकाचे नाव आले का याचीही माहिती घ्या अशा दंगलींमध्ये नाव येते फक्त गोरगरीब सर्वसामान्य तरुणांची आणि आयुष्यभर फरफट होत जाते अशा या तरुणांची त्यामुळे सोशल मीडियामध्ये आभासी जगात जगण्यापेक्षा सत्य परिस्थितीनुसार जगलं तर सर्व गोष्टी समोर येतील त्यामुळे नगर शहराचं जे होईल ते आपल्यालाच करायचे आहे. आणि आपल्यालाच शांतता प्रस्थापित करायची आहे त्यामुळे बाह्य शक्तींना आवरण्याचे कामही आपल्यालाच करावे लागणार आहे.

राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासारख्या अत्यंत कर्तव्यदक्ष असणाऱ्या दिग्गजांचे महायुतीचे सरकार आहे. गृहमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस असल्याने ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाही याची शाश्वती सर्वांनाच आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित असून तिथे न्याय नाही मिळाला तर आपल्याला न्यायालयही उघडे आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात राज्य शासनाकडून कोणत्याही अन्याय होणार नाही आणि सर्वांनाच सामावून पुढे घेऊन जाणारे नेते म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ओळख असल्याने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण असेल किंवा अहमदनगर शहरातील जातीय दंगली बाबत प्रश्न असतील याबाबत ते योग्य ते भूमिका घेतील त्यामुळे आम्हाला बाह्य शक्तींची गरज नाही आमचे प्रश्न सोडवायला नगरकर म्हणून आमचे लोकप्रतिनिधी सोडवायला सक्षम आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular