Home विशेष भाग ३ – कॅफे हाऊस… अंधुक उजेडातलं भीषण सत्य … मेट्रो सिटी...

भाग ३ – कॅफे हाऊस… अंधुक उजेडातलं भीषण सत्य … मेट्रो सिटी प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातही रुजू लागलीय कॅफे हाऊसची धूम.. बालवयात हातात पुस्तकाऐवजी येऊ लागलीय हुक्का ओढायची नळी… अशाप्रकारे चालतात कॅफे हाऊस…

अहमदनगर दि.८ नोव्हेंबर
सुरुवातीला चहाच्या टपऱ्या किंवा कॉफी हाऊस यावर तरुण जाऊन गप्पांचा फड रंगवताना अनेक ठिकाणी चौका चौकात चित्र पाहायला मिळायचे. मात्र आता कॉफी हाऊसचा जागा कॅफे ने घेतली आणि मित्रां ऐवजी मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यात तरुणांना रस येऊ लागलाय. कॅफे हाऊस म्हणजे काय तर एकांत मिळण्याचे ठिकाण अंधुकसा प्रकाश, बसण्यासाठी दोन खुर्च्या आणि एक टेबल पार्टिशन केलेली छोटी रूम आणि पडदा लावून अंधारात बसण्याची सोय म्हणजे कॉफे हाऊस तासाला ठराविक रक्कम देऊन बसण्याची सोय आणि संपूर्ण प्रायव्हसी देणारी ही सिस्टीम असते जे त्याहून जास्त पैसे मोजणारे
त्यांच्यासाठी याहून वेगळी सोय केलेली असते सोफा अथवा मिनी बेड असलेली अशाच प्रकारचं कम्पार्टमेंट असलेली मोठी व्यवस्था. खाणं-पिणं याचे वेगळे चार्ज, हुक्का वगैरे असेल तर त्याचं वेगळं बिल काही विशिष्ट कॉफी शॉप्समध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे इग्ज असतात पण तिथे प्रवेश फक्त नेहमीच्या ‘विश्वासू’ ग्राहकांनाच दिला जातो.

सुरुवातीला महाविद्यालयीन तरुण तरुणी कॅफे हाऊसमध्ये जाताना दिसायची मात्र अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थी सहजपणे शाळांच्या कपड्यांवर या ठिकाणी वावरताना दिसू लागले आहेत. जीवनात प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. मात्र शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना या स्वातंत्र्याचा अर्थच कळत नाही आणि नकळत त्यांच्या हातून अनेक मोठ्या चूका घडून जातात त्या चुका पुढे जन्मभर भोगाव्या लागतात त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या आसपास असणाऱ्या मेट्रोसिटी मध्ये कॅफे हाऊस ही प्रथा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे मात्र अहमदनगर शहरासारख्या अर्ध ग्रामीण भागात सुद्धा आता कॅफे हाऊसची परंपरा रुजू लागली आहे. मागील महिन्यात अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नाशिकमध्ये आणि मालेगाव मध्ये पोलिसांनी काही कॅफे हाऊसवर छापे टाकून कारवाई केली होती तेव्हा या कॅफे पडद्यामागील सत्य बाहेर आले. या छाप्यात आढळलेली अनधिकृत पार्टिशन्स, बदललेल्या अंतर्गत रचना, बर्थ डे सेलिब्रेशन रूमच्या नावाखाली सोफा. बेड-पडदे असलेल्या पार्टिशन करूनबनविलेल्या छोट्या खोल्या. त्यात आढळलेले कंडोम, हुक्का मारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व गप्पांच्या नावाखाली अश्लील चाळे करणारे शाळा-महाविद्यालयातील तरुण-तरुणी.

सज्ञान तरुण तरुणींच्या बाबतीत आपण ढवळाढवळ करू शकत नाही ते त्यांचे व्यक्ती स्वतंत्र असते. मात्र जे अल्पवयीन विद्यार्थी या ठिकाणी जातात जे वय शिक्षण आणि करिअर घडवण्याचा असतं त्याच वयात आकर्षण आणि काहीतरी जाणून घेण्याची इच्छा त्यामुळे नकळत अल्पवयीन मुलांचे पाय चुकीच्या दिशेने पडतात आणि भविष्य अंधकारमय होतं. ज्या वयात शिक्षणाचे स्वप्न आणि भविष्यकाळात काहीतरी ध्येय घेऊन वाटचाल करण्याचा काळ असताना कॅफे हाऊस मध्ये पाय पडणे म्हणजे नक्कीच चुकीच्या दिशेने पाऊल पडणे असंच होय.

आपला मुलगा शाळेत जातो कोणाबरोबर राहतो मोबाईल वापरत असेल तर नेमकं काय पाहतो कोणाबरोबर मोबाईल वरून चॅटिंग करतो तसेच मुलगी असेल तर याच गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आज कालच्या प्रचंड व्यस्त जीवनात अनेक आई-वडिलांचे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होते आणि जेव्हा एखादी मोठी घटना घडते तेव्हा डोळे उघडतात मात्र घटना घडू नये म्हणून प्रत्येक पालकाने जागृत राहणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version