अहमदनगर दि.१ सप्टेंबर
50 लाखासाठी विवाहितेचा छळ केल्याबद्दल विवाहितेच्या तक्रारीवरून नवऱ्यासह सासू आणि सासऱ्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका विवाहितेच्या यांच्या तक्रारी वरून सावेडी गावातील सुरज आबासाहेब वाकळे, आबासाहेब जगन्नाथ वाकळे, उर्मिला आबासाहेब वाकळे यांच्या विरोधात ४९८(A)३२३,५०४,५०६,३४, नुसार तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विवाहितेचे लग्न झाल्यापासून त्यांचा पती सुरज. वाकळे आणि इतर कुटुंबीयांनी त्यांच्या माहेरवरून विविध कारणांनी उसने पैसे आणले होते. मात्र ते देण्यास पती सुरज वाकळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नकार देत उलट इतर कर्ज भरण्यासाठी 50 लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ सुरू केला. तसेच एका छोट्या खोलीमध्ये डांबून ठेवण्यात येत होते. आणि मारहाण करण्यात येत होती यामुळे अखेर त्या विवाहितेने आपल्या माहेरी येऊन सर्व हकीगत सांगितली आणि याप्रकरणी आता तोफखाना पोलीस ठाण्यात त्या विवाहितेच्या फिर्यादी वरून मानसिक व शारीरीक त्रास देवुन उपाशी पोटी ठेवून अपमानास्पद व क्रूरतेची वागणुक देत अंगावरील कपड्यानिशी घराचे बाहेर काढुन देवून नेहमी शारीरीक व मानसीक त्रास दिला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.