अहमदनगर दि.१ सप्टेंबर
अहमदनगर शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन नगर मनमाड रोड वर असणाऱ्या खडकवाडी गावाजवळ फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे या पाईपलाईन फुटल्यामुळे नगर शहराला शनिवारी आणि रविवारी नगर शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती अहमदनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.पहा व्हिडिओ 👇
जरी ती पाईपलाईन फुटली असली तरी आता नगर शहराला पाणीपुरवठासाठी पर्यायी दुसरी जुलवाहिनी असल्यामुळे नगर शहराच्या पाणीपुरवठ्यावर फारसा परिणाम न होता फक्त कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख परिमाण निकम यांनी दिली आहे.