Homeशहरमृत व्यक्ती जिवंत दाखवून चक्क जमिनीची विक्री मोठा घोटाळा येणार समोर... त्या...

मृत व्यक्ती जिवंत दाखवून चक्क जमिनीची विक्री मोठा घोटाळा येणार समोर… त्या बड्या माशांची होणार पोलखोल..

advertisement

नगर दिनांक 10 जून

नगर येथील सावेडी उपनगरात एक धक्कदायक प्रकार घडला असून एका मृत व्यक्तीला जिवंत दाखवून प्लॉट विक्री करण्यात आली आहे.आता हा घोटाळा त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कळल्यानंतर या बाबत कायदेशीर मार्गाने जाऊन हा घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

एक व्यक्ती 2019 मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावावर असलेली जवळपास सहा गुंठे जमीन मृत्यू नंतर वर्षभराने विकली असून तो मृत झालेला व्यक्ती जिवंत दाखवला गेला आहे.यात मोठ मोठ्या धनदांडग्या लोकांचा समावेश असून हे प्रकरण आता मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी कळल्यानंतर त्यांना धक्का बसला असून ते कायदेशीर कारवाईच्या तयारीत आहेत.

ज्या लोकांनी ही जमीन विकत घेतली आहे त्यांनी त्यावर घरे बांधली असून आता खोटी विक्री करून
जमीन लाटणाऱ्या टोळीला घाम फुटला आहे. विशेष म्हणजे नोंदणी अधिकारी काय करतात तलाठी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कोणती शहा निशा न करता खरेदी देऊन टाकतात यावरही प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.

जमीन विक्री करण्यासाठी खोटे खरेदीपत्र तयार करावी लागले असतील तसेच बनावट आधार कार्ड व कागदपत्रे बनवली गेली असतील हे सर्व बनवणारी सुद्धा गुन्हेगारच असतात.

त्या मयत व्यक्तीच्या कुटुंब नगर शहराच्या बाहेर राहत असल्यामुळे त्यांना ही गोष्ट उशिरा लक्षात आली. असून आता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सर्व कायदेशीर बाबी पडताळून पुढील कारवाई करण्यासाठी लवकरच ते पोलीस प्रशासनाकडे जाणार आहेत.

सावेडी उपनगरात मध्यंतरी ताबा प्रकार जोरात सुरू होता. आता थेट मयत व्यक्ती जिवंत दाखवून प्लॉट खरेदी देऊन विकत घेणाऱ्यांना आणि मयत व्यक्तींच्या कुटुंबांना फसवण्याचा प्रकारही आता समोर आल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular