नगर दिनांक 10 जून
अहिल्यानगर शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून. एका रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने महिलेचा एक्सरे रूम मध्ये चोरून व्हिडिओ काढल्याचा प्रकार झाला असल्याची तक्रार रुग्ण महिलेने केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या महिलेने आपल्या नातेवाईकांना बोलवून व्हिडिओ काढणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मोबाईल मधून तो व्हिडिओ डिलीट केला असल्याची चर्चा आहे. तसेच त्या कर्मचाऱ्याला चांगला चोप देण्यात आलाय.
या प्रकरणी आता पोलिस स्टेशन मध्ये तरुणीच्या नातेवाईकांन धाव घेतलीय . ज्या रुग्णालयात हा प्रकार घडला ते शहरातील नामांकित असे रुग्णालय असून अशा रुग्णालयात हा प्रकार घडल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जो प्रकार उघडकीस आला तो त्या महिलेच्या लक्षात आल्याने हे प्रकरण समोर आले आहे. जर त्याने व्हिडिओ काढलाच असेल तर त्या कर्मचाऱ्याने या आधीही काम करत असताना कोण कोणाचे व्हिडिओ काढले आहेत का ? याची तपासणी ही होणे गरजेचे आहे.तसेच या व्हिडिओ काढण्यामागे नेमका उद्देश काय होता ब्लॅकमेलिंग अथवा इतर उद्देशाने हा कर्मचारी व्हिडिओ तर काढत नव्हता ना ! याचे कारण समोर येणे गरजेचे असून अशा विकृत कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
तसेच ज्या ठिकाणी महिला रुग्णांची तपासणी करत असतील त्या ठिकाणी शक्यतो महिला कर्मचारी असणे गरजेचे आहे जर त्या ठिकाणी पुरुष असला तर त्या ठिकाणी त्याच्याबरोबर एक महिला ठेवणे अत्यंत गरजेचे असून अन्यथा अशा विकृत कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण स्टाफचे आणि रुग्णालयाचे नाव खराब होऊ शकते तसेच चेंजिंग रूमच्या परिसरात कोणत्याही व्यक्तीला मोबाईल घेऊन जाण्याची मनाई करणे गरजेचे आहे.
रुग्णालयात कर्मचारी भरती करताना रुग्णालय प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. कारण रुग्णालयात पेशंट प्रवेश करताना सर्वांवर विश्वास ठेवूनच प्रवेश करत असतो. डॉक्टरांना देव समजून रुग्ण डॉक्टरांकडे जात असतो मात्र अशा काही विकृत कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण क्षेत्राचे नाव खराब होते.