Home शहर सर्व्हर डाऊन …जन्म मृत्यू नोंद विभाग ठप्प…. नागरिकांचे हाल.. मेल्यानंतरही बाप दाखव...

सर्व्हर डाऊन …जन्म मृत्यू नोंद विभाग ठप्प…. नागरिकांचे हाल.. मेल्यानंतरही बाप दाखव नाही तर ..अशी परस्थिती.. कोणी लक्ष देणार का? उशिरा नोंद झालेल्या मृत्यू बाबत तहसील कार्यातून मिळणार एक वर्षा नंतर आवहाल… अर्जदार मयत झाल्या नंतर मग काय होणार? ऑनलाइन पद्धत फक्त नावालाच कागदपत्रे स्वतः जाऊन दाखलच करावे लागतात !

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक 24 सप्टेंबर
अहिल्यानगर शहरातील जुन्या महानगरपालिकेत असलेल्या जन्म मृत्यू नोंद विभागात रोज दाखले काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसून येतात महापालिकेच्या कोणत्या विभागात एवढी गर्दी नसेल तेवढे गर्दी या विभागात आठवड्याचे सातही दिवस आणि महिनाभर वर्षभर दिसून येत असते.

Oplus_131072

मात्र अनेक वेळा तांत्रिक (सर्वर डाऊन )कारणामुळे जन्म मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी मोठी कसरत नागरिकांना करावी लागत आहे. त्यामुळे हेलपाटे मारून नागरिक वैद्य गुण दिलेले आहेत जन्ममृत्यूची नोंद करणे म्हणजे एक मोठं युद्ध लढण्यासारखी परिस्थिती आहे. रोज जाऊन रांगेत उभे राहणे नंबर येऊपर्यंत सर्वर डाऊन झाले तर पुन्हा दुसऱ्या दिवशीची वाट पाहणे एवढेच नाही तर लाईनमध्ये उभा राहून सुद्धा आतल्या मार्गाने येणारे अनेक लोक असल्यामुळे आपला नंबर कधी लागेल याची शाश्वती उभा राहिलेल्या माणसाला नसते. त्यामुळे जन्म मृत्यूचा दाखला मिळणे म्हणजे एक दिव्य काम केल्याची प्रचिती जेव्हा दाखला हातात मिळेल तेव्हा त्या माणसाला येत असते.

एजंट मार्फत गेले तर दाखला त्वरित मिळतो मात्र माणूस स्वतः गेला तर त्याला दाखला मिळण्यास मोठा विलंब लागतो ही वस्तुस्थिती आहे. तर यापेक्षा भयानक परिस्थिती म्हणजे एखाद्याच्या मृत्यूच्या अथवा जन्माची नोंद उशिरा लावायची असेल तर एक मोठं दिव्य काम करावे लागत आहे. कागदपत्रे गोळा करूनच मनुष्य अर्धा निम्मा थकून जातो. बाँड पेपर, त्यानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने होणारी पडताळणी,मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला उपस्थित असणारे दोन साक्षीदार त्यांचे आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर हा सर्व बंच घेऊन तहसील ऑफिस गाठावे लागते. त्या ठिकाणी अर्ज दिल्यानंतर पुन्हा महानगरपालिकेच्या कागदपत्रांपेक्षा पुन्हा त्याच पद्धतीने तीन ते चार शंभर रुपयांचे बॉण्ड पेपर सातबारा उतारा, नगरसेवकाचे पत्र, रेशन कार्ड असे अनेक कागदपत्र तहसील ऑफिस मध्ये जमा केल्यानंतर उत्तर मिळते की सहा महिने किंवा एक वर्षांनी पुन्हा या त्यामुळे मनुष्याचे अर्ध अवसान गळून जाते. अनेकांच्या मृत्यूनंतर जमिनीच्या कागदपत्रांसाठी मृत्यू दाखला आवश्यक असतो मात्र मृत्यू दाखला मिळवण्यासाठी वर्ष वर्षभर थांबवावे लागेल असे उत्तर तहसील कार्यालयातून मिळते. त्यामुळे “बाप दाखवण्याचा श्राद्ध कर” या म्हणीची प्रचिती कागदावरून आणि तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावरून निश्चित गेलेल्या नागरिकाला कळते.

शासन सर्व गोष्टी ऑनलाईन करत आहे. मात्र हे फक्त नावासाठीच आहे का काय अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. ऑनलाईन हे फक्त “गोंडस” नाव देऊन सर्व कागदपत्रे महानगरपालिका आणि तहसील कार्यालयात समक्ष जाऊन द्यावेच लागतात तरच काम होते. मात्र वर्षभर थांबून कागदपत्र मिळतील का असा प्रश्नही आता समोर येऊ लागला आहे. त्यामुळे ही पद्धती कुठेतरी बंद करून नागरिकांना लवकरात लवकर दाखले कसे मिळतील यासाठी अधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी कुठेतरी याबाबतीत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version