Homeशहरनगरकरांना नवीन वर्षात मिळणार ११८ लाख लिटर पाण्याचा साठा, शहराचा पाणी प्रश्न...

नगरकरांना नवीन वर्षात मिळणार ११८ लाख लिटर पाण्याचा साठा, शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार!

advertisement

अहमदनगर दि.२८ डिसेंबर

शहराची वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध होणारे कमी पाणी यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने भविष्याची गरज लक्षात घेऊन नगर शहराला पन्नास वर्षा नंतर अमृत पाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले असून या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून फक्त २० ते ३० मीटर काम बाकी आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन नगर शहराला मुबलक ११८ लाख लिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे नगर शहराचा कायम स्वरूपाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लिटर पाण्याच्या टाकीतून गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्णत्वास नेले असून लवकरच या टाकी द्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे नगर शहराला 68 लाख लिटर पाण्याची टाकी व 50 लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे त्यामुळे संपूर्ण नगर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. फेज टू योजनेमधील विविध भागातील टाक्या कार्यान्वित होणार आहे. नगर शहराचा अनेक वर्षांचा पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
वसंत टेकडी येथील जुन्या 68 लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आयुक्त डॉ.पंकज जावळे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, पाणीपुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते, मळू गाडळकर, संतोष ढाकणे आदी उपस्थित होते.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular