Homeशहरॲड.धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून दीक्षित मंगल कार्यालय परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ...

ॲड.धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून दीक्षित मंगल कार्यालय परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न. शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन विकसित शहर निर्माण करू ; आ.संग्राम जगताप.

advertisement

अहमदनगर दि.२० डिसेंबर –
शहरातील गावठाण भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे काम सुरु आहे टप्प्याटप्प्याने ही सर्व कामे लवकरच मार्गी लागतील व शहर खड्डे मुक्त होईल राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत आहेत सर्वच भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत अहमदनगर महानगरपालिकेनेही नियोजन करून रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत अमृत भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे गावठाण भागातील रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.लवकरच ही सर्व कामे मार्गी लावली जातील. ॲड.धनंजय जाधव यांनी प्रभागातील विकास कामांसाठी पाठपुरावा केला असून दीक्षित मंगल कार्यालय परिसरातील रस्ता काँक्रीट करण्याचे काम सुरू झाले आहे. नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकास कामे मार्गी लावल्यानंतर ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येत नाही शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन विकसित शहर निर्माण करायचे आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
मा.नगरसेवक ॲड.धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून  प्रभाग क्रमांक 9 मधील  दीक्षित मंगल कार्यालय परिसरातील रस्त्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मा.उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक प्रदीप परदेशी, संजय ढोणे,गौतम दीक्षित,उल्हास ढोरे,जयंत मुळे, राजेंद्र जोग,जितेंद्र भट्ट,हिरेन भट्ट,दिलीप भट्ट,मेहुल भट्ट, विजय दांडगे,देविदास जोग,बंटी देवसान,रवींद्र कुदळे,अक्षय गांधी,शुभम कासार,सुवर्ण पत्की आदींसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी मा.नगरसेवक ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत प्रभागाचे नियोजनबद्ध विकास कामे सुरू आहेत जमिनी अंतर्गतील विकास कामे मार्गी लावून रस्त्याची कामे हाती घेतले आहेत. आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून दीक्षित मंगल कार्यालय परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मार्गी लागले आहे. टप्प्याटप्प्याने प्रभागातील सर्वच विकास कामे मार्गी लावू नागरिकांच्या सूचनेनुसार विकास कामे सुरू आहेत. दीक्षित मंगल कार्यालय परिसरातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपूर्वी झाले होते ते आता मार्गी लागले आहे असे ते म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular