अहमदनगर दि.२० डिसेंबर
अहमदनगर महानगर पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची १७ मुद्यांच्या प्राथमिक चौकशीची कार्यवाहीत दोषी आढळल्याबद्दल त्यांचे निलंबिन करावे अशी मागणी तारीक आसिफ कुरेशी यांनी महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत तारीक कुरेशी यांनी महानगरपालिकेला या आधीही निवेदन मिळून निलंबनाच्या मागणी केली होती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांची चौकशी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी कोरोना काळातील विविध मुद्द्यांवर दोषी ठरवून सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
त्यांनंतर त्यांना पुन्हा त्याच पदावर रुजू करून घेतले होते मात्र बोरगे यांची प्राथमिक चौकशीचा अहवाल चौकशी अधिकारी यांनी महानगरपालिकलेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठरे, आपल्याकडे सादर केला असून काही मुद्यांमध्ये डॉ. बोरगे दोषी असल्याचे आढळुन आलेले आहे. त्या कारणाने अहवालात आलेल्या १७ मुद्यांच्या आधारे काही मुद्यांत दोषी ठरवले असुन त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही ७ दिवसात करावी अन्यथा आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्याविरुध्द फौजदारी प्रक्रिया संहिता कलम१९७ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यास आम्हांला परवानगी मिळावी अशी मागणी तारीक आसिफ कुरेशी यांनी केली आहे.