Home विशेष वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे घेऊन जातोय आदित्य धनंजय जाधव

वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे घेऊन जातोय आदित्य धनंजय जाधव

अहमदनगर दि.१२ नोव्हेंबर

रस्ते कितीही चांगले असले तरी रस्त्यांवर छोटे मोठे दगड अथवा काही टणक वस्तूंमुळे तसेच वाहांच्या धाडकेत मृत्यू पावलेल्या भटक्या कुत्रे आणि इतर प्राण्यांमुळे लक्ष विचलित होईन भारदाव वेग असल्याने अनेक वेळा अपघात होत असतात मोठं मोठ्या महारमार्गांचे काम चांगले असल्याने वाहने जास्त वेगाने जात असताना रस्त्यावर पडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा मोठमोठे अपघात होऊन शेकडो लोकांचे मृत्यू झाल्याचे बातम्या याआधी आपण वाचल्या आहेत. त्यामुळे नेहमीच मोठमोठ्या हायवेवरून जाताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हवेवर असणाऱ्या छोटा मोठा वस्तू दिसल्या तर नक्कीच गाडी एक मिनिट बाजूला थांबून त्या वस्तू रोडवर वरून काढून बाजूला टाकाव्यात की जेणेकरून त्यामुळे एखाद्याचा अपघात होऊ नये दिवसा नाही मात्र रात्री नक्कीच या गोष्टींमुळे अपघात होण्याची शक्यता असते आणि तसे अपघात झालेले आहेत.

साध्या प्लास्टिकच्या बाटल्यामुळे मोठे अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत यामुळेच नगर शहरातील माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते धनंजय जाधव हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात राजकारण कमी आणि समाजकारण जास्त अशी त्यांची ओळख आहे मात्र शहरात नव्हे तर प्रवास करताना रोड पडलेल्या अशा छोट्या-मोठ्या गोष्टी समोर दिसल्या की गाडी बाजूला थांबून त्या रस्त्यावरून दूर करण्याचे काम ते करत असतात.

त्याचप्रमाणे म्हणतात ना वडिलांचे गुण हे आपल्या मुलांमध्ये येत असतात त्यानुसार आता धनंजय जाधव यांचे चिरंजीव आदित्य धनंजय जाधव हा सुद्धा त्यांचा हा वसा पुढे घेऊन जातोय गोष्ट छोटी आहे मात्र एक मोठा अपघात या पासून होऊ शकतो आणि एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्ती या अपघातामध्ये मृत्यू होऊ शकतो त्यामुळे या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता नेहमीच आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून अशा गोष्टी दूर करणं हे आपलं कर्तव्यच आहे या भावनेतून आदित्य जाधव सुद्धा आपल्या वडिलांचा हा वसा पुढे घेऊन चालला आहे. हे कार्य प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आहे की जेणेकरून आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version