दिल्ली-१७ एप्रिल
हनुमान जयंतीनिमित्त १६ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना दिल्लीतील जहांगीरपुरी येथे घडली होती.पहा व्हिडीओ
या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १४जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार, ही मिरवणूक जहांगीरपूरच्या सी ब्लॉकमधील जामा मशिदीजवळ पोहोचली तेव्हा अन्सार नावाचा एक व्यक्ती त्याच्या चार-पाच साथीदारांसह पोहोचला आणि मिरवणुकीत सामील असलेल्या लोकांशी वाद घालू लागला. यानंतरच वाद वाढत गेला आणि दगडफेक सुरू झाली अशी फिर्याद नोंदवण्यात आलीय
अन्सार आणि इतर १३ जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले मात्र त्याचा एका कृत्या मुळे चीड निर्माण होत असून पुष्पा मधील झुकेगा नही साला अशी नक्कल त्याने वृत्तवाहिणींनीचे कॅमेरे पाहून केली आहे.