अहमदनगर दि .१० नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर मधील तारकपूर, प्रोफेसर कॉलनी,प्रेमदान चौक , बालिकाश्रम रोड सीव्हील हडको,गुलमोहर रोड, पाइपलाईन रोड, प्रेमदन चौक भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. कधी लाईट येते आणि कधी लाईट जाते हे समजण्या पलीकडे गेले आहे. मात्र असे का होते हे शोधण्यासाठी महावितरण कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून ठिकठिकाणी तपासणी करत आहेत. मात्र लाईट येण्या-जाण्याचा फॉल्ट अद्यापही वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सापडल्या नसल्याने बहुतांश भाग हा अंधारातच आहे.
सध्या दिवाळीचा सण सुरू असून घराघरात उत्साहाचे वातावरण आहे रंगीबेरंगी लायटिंगने अनेकांनी घरे सजवले आहेत. मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे अनेक कामांवर याचा परिणाम झाला आहे. दिवाळीचा सण असल्याने घरात फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरू असतानाच विजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे या उत्साहावर पाणी पडले आहे. मात्र वीज वितरण कंपनी ही गोष्ट गांभीर्याने घेत नसल्यामुळे सण उत्साहाच्या काळातच नागरिकांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत तर अनेक वेळा फोन करूनही प्रतिसाद भेटत नसल्याने नागरिक संतप्त होत आहेत.
दरवर्षी ऐन सणासुदीलात असे का होते हा एक मोठा गंभीर प्रश्न आता समोर आला आहे. इतर वेळेस वीज वितरण कंपनी अथवा लाईटचा काहीच प्रॉब्लेम नसतो मात्र ऐन सणासुदीलाच असं का होते किंवा कोणी खोडसाळपणा करून सणासुदीला नागरिकांना त्रास देण्याचा उद्देशाने हे काम करतेय का याचा शोध घेणे ही गरजेचे आहे.