Home शहर आपल्या परिसरात भटके कुत्रे आहेत तर मग उचला फोन करा डायल...

आपल्या परिसरात भटके कुत्रे आहेत तर मग उचला फोन करा डायल “हा” नंबर… शिवसेनेच्या वतीने नागरिकांसाठी जाहीर करण्यात आला हा नंबर…

अहमदनगर दिनांक ८ डिसेंबर

अहमदनगर शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत एवढी झाली आहे की आता नागरिकांना रस्त्यावरून चालणे ही मुश्किल झाले आहे. तर लहान मुलांना खेळायला जाण्यासाठी किंवा शाळेत जाण्यासाठी बाहेर पडणे मुश्किल होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वयोवृद्ध नागरिक किंवा महिला असतील यांच्यावरही मोकाट कुत्र्यांची हल्ले होत असल्यामुळे नगर शहरातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी दोन शालेय मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर याप्रकरणी युवा सेनेचे राज्य सरचिटणीस विक्रम राठोड आणि नगरसेवक योगीराज गाडे यांनी त्या शालेय विद्यार्थ्यांना घेऊन थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दारात जाऊन जाब विचारला होता यानंतर थातूरमातूर कारवाई करत महानगरपालिकेच्या वतीने त्या भागातील फक्त एक कुत्र पकडण्यात आलं.
आणि पुन्हा आज लहान मुलांवर या भागात भटक्या कुत्र्यांचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

वास्तविक पाहता महानगरपालिका भटके कुत्रे पकडण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करत असताना नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आणि संबंधित ठेकेदाराची असतानाही याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे.अशी परिस्थिती सध्या अहमदनगर शहरात दिसून येत आहे.

याबाबत युवा सेनेचे राज्य सरचिटणीस विक्रम राठोड यांनी याआधीही आवाज उठवला होता कुत्र्यांच्या निर्बिजीकरणामध्ये मोठा घोटाळा होता. मात्र तरीही त्याच ठेकेदाराला पुन्हा काही काळापुरता ठेका देण्यात आला होता मात्र नगर शहरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना पिल्ले होत आहेत मग यांचे बाप नेमके कोण हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

आता नगर शिवसेनेच्या फेसबुक पेजवरून नगर शहरातील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी एक नंबर व्हायरल करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असेल तर
8329520865 या नंबर वर आपलं नाव, मोबाईल नंबर, आपले ठिकाण व तेथील कुत्र्यांचा फोटो पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version