अहमदनगर दि.१ डिसेंबर
नगर मध्ये काही दिवसांपासून तरुणांच्या व्हाट्सअप स्टेटस वर अनेक गुंडांचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत तरुणांना याबाबत या गुंडाबाबत आणि त्यांनी केलेल्या कारणाने बाबत चिकित्सा असेल किंवा आकर्षण असेल पण यामुळे ही पिढी नेमकी कुठे चालली हा प्रश्न आता समोर येतोय.
पुण्यात काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या सुटकेनंतर जी मिरवणूक काढण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्याच्या समर्थकांनी पुण्यापर्यंत जो धुडगूस घातला या सगळ्याच गोष्ट अशोभनीय अशाच होत्या. त्याचप्रमाणे आता अहमदनगर शहरात काही दिवसांपूर्वी जमिनीवर सुटलेला एक गुंड तारखेसाठी न्यायालयात आला असताना त्याच्या मागे आलेल्या चार चाकी गाड्यांच्या रांगाचा रांगा आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ पाहता नगर शहर नेमकं चाललंय कुठे हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ अनेक तरुणांच्या व्हाट्सअप स्टेटस वर लागला जातोय. यामुळे काही महत्त्वाचे आणि अत्यंत चिंता निर्माण करणारे प्रश्न नगरकरांसाठी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा उहापोह करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज नगर मध्ये ज्या प्रकारे गुंडांचं जे काही उदात्तीकरण होत आहे किंवा त्यांची जी क्रेझ वाढत आहे त्यामुळे नगर आणि त्याच्या आसपासच्या अनेक ग्रामीण भागातील तरुण हे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.
नगर शहरात चित्रपट स्टाईल दोन खून मागील सहा महिन्यात झाले आहेत या प्रकरणात चित्रपट स्टाईल असेच खून करण्यात आले तलवार बंदुकी धारदार हत्यारे वापरून चित्रपटाला शोभेल असे खून नगर शहरात झाले आहेत तर एका सामाजिक कार्यकर्त्यालाही जुळे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यावरूनच पोलिसांचा धाक कुठेतरी कमी होतोय आणि गुंडागर्दीला कुठेतरी अभय मिळते असाच दिसून येत आहे कारण जेलमध्ये गेल्यावर सुद्धा या गुंडांचे कारनामे बंद झालेले नाहीत एका गुंडाने तर थेट स्वतःचा खोटा भाऊ बनवून दुसऱ्याच तरुणाला भेटण्यासाठी बोलण्याचा प्रकार उघडकीस आलाय.
खरं तर नगर शहर हे रिटायर आणि सोशिक नागरिकांचे राहण्याचे शहर अशीच त्याची ओळख होती. पण नगर शहरातील उपनगरांमध्ये आणि आसपासच्या ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिस्थिती खूप वेगाने बदलत गेली. जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. शरद वाढती बेरोजगारी कमी श्रमात जास्त पैसा मिळवण्यासाठी मारण्यात येत असलेले ताबे अवैद्य दंडातून मिळणारा बक्कळ पैसा बंदी असलेले सुगंधी सुपारी गुटके बायोडिझेल असे अनेक अवैद्य धंद्यामुळे येणारे पैसे यामुळे येथील तरुणांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा आला आणि हीच गोष्ट आता येथील वाढत्या गुन्हेगारीला देखील कारण असल्याचं दिसून येत आहे.
नगरची आर्थिक सुबत्ता वाढत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हे बदल हेरुन आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पण हे ही लोकं फक्त एवढ्यावरच थांबली नाही तर काही तरुण मुलांना हाताशी धरुन त्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसा कमवण्यास सुरुवात केली. यामुळे हळूहळू येथील गुंडांना एक प्रकारचं वलय निर्माण झालंय . ब्रँडेड वस्तू, आलिशान गाड्या.. शेकडो लोक मागे-पुढे असणं… याच गोष्टी आजकालच्या तरुणांना आकर्षित करतात आणि मग त्यातूनच गुंडा करी कडे आपोआप पावले वळू लागतात.
एखादा गुन्हा करायचा काही दिवस जेलमध्ये प्रवास केल्यानंतर पुन्हा जमिनीवर बाहेर आल्यानंतर पुन्हा गुंडागर्दी सुरू करायची आणि जेलची वारी केल्यामुळे आपोआपच सर्वसामान्य माणूस घाबरतोच पण अशांच्या नादी नको लागायला म्हणून इतर लोकही अशा गुंडांपासून दूर राहतात आणि त्यामुळेच अशा गुंडांचे काम सोपे होते आणि ते पुन्हा गुंडागिरी सुरू करतात आणि याचेच आकर्षण तरुणांना होते आणि असे तरुण या गुंडांच्या मागे जाऊ लागतात आणि त्यातून आपोआपच एखादी टोळी निर्माण होते.
ही गोष्ट समाजाला जशी घातक आहे तशी प्रत्येक तरुणाच्या घरच्यांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे तरुणांनी आकर्षित जरूर व्हावे मात्र ते ध्येयवेड्या लोकांनी केलेल्या चांगल्या कामाकडे अशा चुकीच्या कामाकडे आकर्षित होऊन शेवटी घराची राख रांगोळी झाल्याशिवाय दुसरे काहीच हाती येत नाही हेही तेवढेच सत्य आहे.