अहमदनगर – दि.१ सप्टेंबर
अहमदनगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या( Ahmednagar City Taluka Chemist Association )कार्यकारिणीची सन २०२२ ते २०२५ वर्षाकरिता नुकतीच निवडणूक ( election)पार पडली. सदर निवडणुकीकरिता निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अभय गुगळे,अनिल गांधी व जयंत रंगा यांनी काम पाहिले. सदरची निवडणूक ही २१ जागांकरिता होती. या निवडणूकीमध्ये मागील कार्यकाळातील अध्यक्ष श्री. दत्ता गाडळकर यांच्या नेतृत्वाखालील केमिस्ट सेवा पॅनलने(Chemists Seva Panel ) सर्वाधिक जागा जिंकून या निवडणूकीत दणदणीत विजय (victory) प्राप्त केला. यानंतर नवनियुक्त कार्यकारिणीची सदस्यांची सभा होऊन यामध्ये पदाधिकारी निवडण्यात आले. नवनियुक्त कार्यकारिणीने मागील कार्यकाळातील अध्यक्ष .दत्ता गाडळकर यांची पुनः पुढील कार्यकाळाकरिता अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड केली. त्यानंतर नूतन अध्यक्षांनी कार्यकारिणी जाहीर करीत उपाध्यक्ष भरत सुपेकर, सचिव मनिष सोमाणी, सह सचिव मनिषा महेश आठरे, व खजिनदार मनोज खेडकर या पदांची नियुक्ती केली. तसेच कार्यकारणी मध्ये आशुतोष कुकडे, रुपेश भंडारी, अमित धाडगे, युवराज खेडकर,अवधूत बोरुडे,कमलेश गुंदेचा,पूजा सुभाष दिवटे-सातपुते, सुधीर लांडगे, सुधाकर बोरुडे, राजेंद्र बेद्रे, महेश अनमल, मिलिंद क्षिरसागर, संकेत गुंदेचा आदेश जाधव, संदिप कोकाटे व महेंद्र अनमल यांची निवड करण्यात आली निमंत्रीत सदस्य म्हणून ज्ञानेश्वर पठारे, राहुल जाधव, सचिन ढगे, संदिप डहाळे, सुधाकर इंगळे, सागर फुलसौंदर, राहुल पवार, अभिजीत गांगर्डे, अनिल क्षिरसागर आदींची निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल अभय गुगळे,अनिल गांधी व जयंत रंगा यांचा सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष दत्ता गाडळकर म्हणाले की, अहमदनगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सभासदांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला तडा न जाता सभासदांचे विविध प्रश्न मार्गी लावू सर्वांना बरोबर घेऊन चांगले काम उभा करू व संघटनेचा नावलौकिक वाढवून सर्वांना विश्वासात घेऊन असोसिएन चे कामकाज केले जाईल आशुतोष कुकडे यांचे केमिस्ट सेवा पॅनलला मार्गदर्शन लाभले असे ते म्हणाले.यावेळी नूतन सचिव मनीष सोमानी यांनी सर्वांचे आभार मानले.