Home शहर रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी साई द्वारका सेवा ट्रस्टचा मदतीचा हात गरजू रुग्णांची...

रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी साई द्वारका सेवा ट्रस्टचा मदतीचा हात गरजू रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा – ॲड. धनंजय जाधव

अहमदनगर दि.१ सप्टेंबर –
सण-उत्सव, वाढदिवस ( birthday) साजरी करत असताना प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासावी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून मदतीचा हात देणे गरजेचे आहे. साई द्वारका सेवा ट्रस्टच्या(Sai Dwarka Seva Trust for medical treatment of patients)माध्यमातून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांना अर्थसहाय्य केले जाते. गरजू रुग्णांना (patients) मदतीचा हात देवून आपले कर्तव्य पार पाडण्याचे काम साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. राजू मामा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णाला उपचारासाठी अर्थसहाय्य रुपी धनादेश देण्यात आला आहे. गरजू रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उपचाराशिवाय राहू नये यासाठी साई द्वारका सेवा ट्रस्ट ने पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला जातो आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असून दिनदुबळ्या रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय प्रश्न घेतला असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष ॲड. धनंजय जाधव यांनी केले.

राजू मामा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने गरजू रुग्णाला उपचारासाठी आर्थिक धनादेश प्रदान करण्यात आला यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. धनंजय जाधव, बाळासाहेब ढवन, दीनानाथ जाधव, पुरुषोत्तम सब्बन, अभिमन्यू जाधव, ज्ञानेश्वर दौंडकर, सचिन उदगीरकर, तुकाराम रामगिरी, आदिनाथ जाधव, किरण बोगा, सोमनाथ जाधव, किरण पवार, ओम पुंड, रुपेश येंगुपटला, श्रीकांत उदगीरकर, ऋषिकेश बिडकर आदी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version