Homeक्राईमपोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची धडाकेबाज कारवाई तीन कॅफे हाऊसवर छापे.. अश्लील...

पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची धडाकेबाज कारवाई तीन कॅफे हाऊसवर छापे.. अश्लील चाळे करण्यासाठी उपलब्ध करून देत होते जागा…

advertisement

अहमदनगर दिनांक 17 फेब्रुवारी

अहमदनगर शहरात सुरू असलेले विविध कॅफे हाऊसवर पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकाने छापा टाकून कॅफे चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
THE LOVE BIRDS CAFE चा मालक ऋषिकेश सखाराम निर्मळ रा. झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहमदनगर, ORGENO CAFE चे मालक अविनाश विलास ताठे रा. पंपिंग स्टेशन रोड सावेडी अहमदनगर,GOLDAN FLAM CAFE चे मालक सार्थक अनिल गंधे रा. बालिकाश्रम रोड गंदे मळा अहमदनगर (मालक) (फरार) व काम करणारा शिबान मुअंदे रा. बालिकाश्रम अहमदनगर यांच्या विरोधात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


अहमदनगर शहरात कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट उपलब्ध करून तिथे शालेय विद्यार्थ्यांसह कॉलेज विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सोय करण्यात येते याबाबत “आवाज महाराष्ट्राचा” या वेब पोर्टलवरून अनेक वेळा वस्तूस्थिती मांडण्यात आली होती.

अहमदनगर शहराचे नवनियुक्त शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा अवैद्य कॅफेवर कारवाई करण्याचा धडाका सुरू केला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सो अहमदनगर श्री राकेश ओला व मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, अहमदनगर, Hc/ सुयोग सुपेकर, Hc/ संतोष ओव्हाळ, Hc/गणेश चव्हाण, Hc/सचिन जाधव,Hc/ हेमंत खंडागळे Hc/ सचिन मिरपगार व PC/ सागर द्वारके केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular