Homeराजकारणराष्ट्रवादीची जम्बो कार्यकारणी जाहीर.. पदाचा उपयोग सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी करा -...

राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारणी जाहीर.. पदाचा उपयोग सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी करा – आमदार संग्राम जगताप

advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जम्बो कार्यकारिणीची निवड आज शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सावेडी भागातील माऊली सभागृह येथे पार पडली.यावेळी नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करत त्यांना पक्षात्मक वाटचालीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी मार्गदर्शन केले. या कार्यकारणीच्या माध्यमातून निश्चितपणे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम केले जाईल. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नूतन कार्यकारिणीने असे जनहितकारी उपक्रम राबवावेत ज्या कामांचा नावलौकिक राज्यभर घेतला जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना केले.

पुढे मार्गदर्शन करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की पदाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम प्रत्येक सदस्याने केले पाहिजे. कार्यकारिणीच्या विविध उपक्रमांमार्फत आपण पक्ष संघटना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम करू शकतो. प्रत्येकाने संघटनेसाठी वेळ काढून संघटन वाढीचे काम करावे. यामुळे भविष्यात जनसामान्यांना कोणतीही अडचण आली तरी ते पुन्हा तुमच्याकडे हक्काने यायला विसरत नाहीत. संघटना, पद हे केवळ नावापुरते न घेता आपल्या कार्याची दखल पक्ष तसेच सर्वसामान्यांनी घ्यायला हवी, असे कार्य प्रत्येकाने करावे. आपण या कामाच्या माध्यमातून स्वतःची व पक्षाची समाजात एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो. कायम सकारात्मक ऊर्जा घेऊन काम केल्याने निश्चितच त्याचे परिणामही चांगलेच मिळतात. समाजात वेगवेगळा हेतू ठेवून काम करणारे अनेक जण आहेत. परंतु आपण फक्त समाजाच्या भल्याचा दृष्टिकोन समोर ठेवून कार्य केले पाहिजे. संघटना एक मोठे छत्र आहे, या छत्राखाली अनेक जण येतात – जातात परंतु संघटना ही कायम मोठी होत राहते. कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करावे. पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कार्याचा लेखाजोगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. शहरात राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेली विकासकामे देखील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे असे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रा. माणिकराव विधाते, मा. नगरसेवक कुमार सिंह वाकळे, डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अविनाश घुले, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, केतन क्षीरसागर, रेश्माताई आठरे, अंजली आव्हाड, साधना बोरुडे, उबेद शेख, अजिंक्य बोरकर, संजय सपकाळ, प्रा.अरविंद शिंदे, विजय गव्हाळे, आरिफ शेख, गजानन भांडवलकर, दिनेश जोशी, राजेश भालेराव, साहेबान जहागीरदार, ऋषी ताठे, जॉय लोखंडे, योगेश नेमाणे, अमित खामकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular