अहिल्यानगर दिनांक 3 डिसेंबर
अहिल्या नगर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे, यांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी श्रीगोंदा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप सातपुते यांनीही पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना फुटी नंतर नगर शहरातून सर्वप्रथम दिलीप सातपुते यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली होती. त्याबरोबर त्यांना नगर शहर शिवसेना प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर दिलीप सातपुते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फारसे रमले नाहीत त्यांनी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता श्रीगोंदा येथे झालेल्या एका जाहीर सभेत दिलीप सातपुते यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा दिलीप सातपुते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले असून त्यांना आता नव्याने त्यांच्यावर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.