अहिल्यानगर दिनांक ४ जानेवारी
अहिल्यानगर शहराच्या शेजारून जाणाऱ्या रिंग रोडवर टोल नाका सुरू झाला असून सोलापूर रोड वरून शिर्डी कडी तसेच पूना रोडवरून शिर्डी कडे कल्याण रोड वरून पुणे रोड कडे जाणाऱ्या वाहनांना आता टोल भरावा लागत आहे. हुले कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून टोल वसुली केली जात आहे.
मात्र या टोल नाक्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कर्मचाऱ्यांच्या तैनातीबाबत जे परिपत्रक जारी केले आहे त्या सर्व नियमांना तिलांजली दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्रत्यक्षात टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य प्रवाशांशी असभ्य वर्तन होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कर्मचाऱ्यांच्या तैनातीबाबत नवीन परिपत्रक जारी केले होते. NHAI ने महामार्ग टोल प्रकल्प संचालकांना याबाबतचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कर्मचाऱ्यांच्या तैनातीबाबत परिपत्रकानुसार हा टोलवसुली कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पोषकाबाबत नियमावली दिली आहे.
असा असेल पोशाख
NHAI ने निर्धारित केलेल्या ड्रेस कोडनुसार, टोल वसुली कर्मचाऱ्यांना नेव्ही-ब्लू रंगाचे शर्ट आणि ट्राउझर्स घालावे लागतील. डोक्यावर स्पोर्ट्स कॅप घालावी लागेल. या टोपीवर संबंधित कंपनीचा मोनो लोगो छापलेला असावा . सुरक्षा पट्ट्याचे बकल देखील मोनो असेल. सुरक्षा जाकीट आणि काळे शूज घालावे लागतील.त्याच बरोबर टोलवर तैनात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्यासोबतच त्यांना शिष्टाचार शिकवण्यासाठी सात दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात यावे असे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे खासगी कंपन्यांना कंत्राटावर देण्यात आलेल्या टोलसह एमओटी अंतर्गत काम करणाऱ्या कंपन्यांच्या टोलनाक्यांवर आतापर्यंत गणवेश आणि ओळखपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे कारण टोल टॅक्स वसूल करताना कर्मचारी वाहनचालक लोकांशी उद्धटपणे वागतात वाहनचालकांशी दादागिरीनेच बोलत नाहीत तर शिवीगाळ मारामारीही करतात मात्र त्यांना ड्रेस कोड नसल्याने दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.देशभरात अशा तक्रारींची वाढती संख्या पाहता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व टोलनाक्यांसाठी परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये टोल कामगारांच्या मानकीकरणाव्यतिरिक्त टोल स्लिप आणि टोल फी दर्शविणाऱ्या फलकांचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. टोल कर्मचाऱ्यांनीही ड्युटीवर असताना गणवेश परिधान करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर टोल नाक्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे कर्मचारी नसावेत यासाठी कंपनीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे स्थानिक पोलीस स्टेशनचे चारित्र्य पडताळणीचे दाखले ही घेण्याबाबतची सक्ती करण्यात आली आहे.
मात्र या सर्व बाबींना नगर शहरात भरून जाणाऱ्या टोल टॅक्स वसूल करणाऱ्या कंपनीने तीलांजली दिली कोणताही कर्मचारी ड्रेस कोडवर या ठिकाणी दिसून येत नाही तसेच स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार चारित्र्य पडताळणीचे कोणतेही दाखले कंपनीकडून घेण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे कर्मचारी नेमणूक केली असल्यास आणि त्यांच्याकडून भविष्यात एखाद्या प्रवशास काही इजा झाल्यास याला जबाबदार कोण राहणार असाही प्रश्न आता उपस्थित होतेय.
तर टोल वसुलीसाठी थेट वाहनधारकांनाच बळजबरीने या टोल कडे वळवण्याचा प्रकार सुरू मध्यंतरी उघडकीस आला असून काही गुंडांकरवी पुणे रोडवर थांबून छोट्या वाहनधारकांना बळजबरीने या टोल रोडने जाण्यास भाग पाडले जात आहे असा प्रकार समोर आला होता. पुण्यावरून आलेले वाहन थेट अहिल्यानगर मध्ये न जाता हे वाहन या टोल मार्गावरून कसे जाईल यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे लोक नगर पुणे रोडवरील बायपास चौकात हॉटेल नील समोर उभा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका वाहनधारकाने नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केलेला आहे.