अहिल्यानगर दिनांक 26 डिसेंबर
एमआयएम पक्षाने छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जालना अहिल्यानगर,मुंबई परभणी, लातूर महापालिकांसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला असून उमेदवारांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने महाराष्ट्रातील काही महापालिकांसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. AIMIM चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पत्रकाद्वारे ही यादी जाहीर केली आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक चार मधून शहनाज खालिद शेख – सलमा जबीर शेख -शाहबाज अहमद सय्यद – समद वहाब खान यांची नावे जाहीर करण्यात आली असून AIMIM ची ही पहिली यादी आहे अजूनही काही उमेदवार जाहीर होणार असल्याने सर्वांचे लक्ष पुढच्या उमेदवारी यादी तिकडे लागले आहे.