मुंबई दिनांक 12 जून
“ड” वर्ग दर्जाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकी करता आता वेळापत्रक आले असून सुरुवातीला प्रभाग रचना आणि मतदार यादी याबाबत करावयाच्या कामाबाबत महानगरपालिकेंना आदेश देण्यात आले आहेत.
प्रगणक गटाची मांडणी करणे त्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना अधिकार देण्यात आले असून 11 जून 2025 ते 16 जून 2025 पर्यंत ही मांडणी करणे बंधनकारक आहे.
प्ररूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी 11 जून ते 16 जून अशी मुदत देण्यात आली आहे.
प्रमुख प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्याची तारीख 4 जुलै 25 ते 8 जुलै 2025 पर्यंत हा प्रस्ताव निवडणूक आयोग कडे पाठवणे बंधनकारक राहणार आहे.
प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर सूचना हरकती मागवणे 15 जुलै ते 25 जुलै 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी प्रतिकृत केलेल्या अधिकाऱ्याने पप्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेण्याची तारीख 22 जुलै ते 31 जुलै पर्यंत ठेवण्यात आली आहे.
सुनावणीनंतर हरकती सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन अधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास मान्यतेस पाठवण्याची तारीख 1 ऑगस्ट 2025 ते 7 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यांनी मान्यता दिलेली प्रभाग रचना सर्वाधिक संबंधित महापालिका आयुक्तांनी यांना कळवण्याची तारीख तर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्याची तारीख 22 ऑगस्ट 2025 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे.
22 ऑगस्ट 2025 मध्ये अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर पुढे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि त्यानंतर निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे.