Home शहर छावणी मंडळ आणि संरक्षण विभागाचा भाग शहरात कसा ? २,३,५,१०,१३, प्रभागांवर...

छावणी मंडळ आणि संरक्षण विभागाचा भाग शहरात कसा ? २,३,५,१०,१३, प्रभागांवर मावळा प्रतिष्ठानची हरकत.. प्रभाग रचना रद्द करून पुन्हा जाहीर करा..

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक 9 सप्टेंबर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्ररुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यावर हरकती घेण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आले असून महानगरपालिकेत आता अनेक प्रभागातून हरकती येण्यास सुरुवात झाल्या आहेत.

Oplus_131072

प्रभाग क्रमांक दोन,तीन, पाच, दहा आणि तेरा या प्रभागांवर मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील यांनी हरकत घेतली असून या माधे प्रभाग क्रमांक २ च्या प्रारूप आराखाड्यात निर्मलनगर परिसरातील पोलीस कॉलनीच्या मागील अहमदनगर कॅन्टोन्मेंट/ संरक्षण विभागाचा मोठ्या प्रमाणातील भूभाग दर्शविण्यात आलेला आहे.

प्रभाग क्रमांक ३ च्या प्रारूप आराखड्यात दर्शविण्यात आलेला केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचे सी. क्यू. ए. व्ही. विभागाचे कार्यालय व लगतचा परिसर दर्शविण्यात आलेला आहे.

प्रभाग क्रमांक ५ च्या प्रारूप रचनेत दर्शविण्यात आलेला नगर मनमाड रोडचा तारकपूर परिसरातील चर्च, सेंट झेव्हियर्स विद्यालय, थोलार प्रदीप हॉस्पिटल, सिटी केयर हॉस्पिटल, साई एशियन हॉस्पिटल, तसेच रस्त्याचे समोरील बाजूचा संपूर्ण परिसर जीवन प्राधिकरण कार्यालय, एस टी. स्टॅन्ड, थापर हॉटेल, सिंग रेसिडेन्सी, राज्य कर्मचारी वसाहत, जुने आर. टी. ओ. कार्यालय, कृष्णा इन्क्लेव्ह, महेश थियेटर, पीडब्लूडी कार्यालय व विश्राम गृह, आयकर भवन, राधाबाई काळे महाविद्यालय, कराचीवाला नगर, मॉडेल कॉलनी, रामवाडी झोपडपट्टी, फलटण चौकी चा परिसर हा भूभाग अहमदनगर कॅन्टोन्मेंट च्या अखत्यारीत असून तो प्रारूप रचनेत दर्शविण्यात आलेला आहे.

प्रभाग क्रमांक १० च्या प्रारूप रचनेत दर्शविण्यात आलेला एस. टी. कार्यशाळा, गोकुळवाडी, कॅम्प कौलारू, एस. टी. कॉलनी, कोठला झोपडपट्टी, मंगलगेट चा काही परिसर, राज चेंबर्स, ईदगाह मैदान, दीपाली थिएटर हा भूभाग देखील अहमदनगर कॅन्टोनमेंट च्या हद्दीतील असून तो देखील प्रारूप रचनेत दर्शविण्यात आलेला आहे.

प्रभाग क्रमांक. १३ च्या प्रारूप रचनेत दर्शविण्यात आलेला जनरल पोष्ट ऑफिस, बूथ हॉस्पिटल, सी. एस. आर. डी., अहमदनगर महाविद्यालय व नवीन आर. टी. ओ. कार्यालय हा भूभाग देखील अहमदनगर कॅन्टोन्मेंट च्या हद्दीतील असून प्रभाग रचनेत दर्शविण्यात आलेला आहे.

आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या प्रारूप आराखड्यात वरील प्रमाणे प्रभागात संरक्षण विभागाचा व अहमनगर कॅन्टोन्मेंट चा व मनपा हद्दीत समाविष्ट न झालेला भूभाग दर्शविण्यात आलेला असून १ ते ५ मध्ये नमूद केलेला संरक्षण विभागाच्या व अहमदनगर कॅन्टोन्मेंट च्या अखत्यारीत हद्दीत असणारा भूभाग हा आजतागायत तत्कालीन अहमदनगर नगरपरिषद किंवा विद्यमान अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्याची कुठलीही कायदेशीर प्रक्रिया आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेली नाही हे सुद्धा निलेश म्हसे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

अहिल्यानगर महानगरपालिका कडे वर नमूद अहमदनगर कॅन्टोनमेंट चा भूभाग हा अहमदनगर कॅन्टोनमेंट कडून तत्कालीन अहमदनगर नगर परिषदेकडे हस्तांतरित केलेबाबतची कागदपत्रांची माहिती मागविण्यात आली असता. सदरचा भूभाग हा सन १९५८ साली अहमदनगर कॅन्टोन्मेंट कडून तत्कालीन नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करून नगरपरिषदेची हद्दवाढ झालेली आहे असे कळविण्यात आले. त्यासाठी सदर हस्तांतरण प्रक्रियेसंबंधीची केंद्र व राज्य शासनाचे अत्यंत महत्वपूर्ण कागदपत्रांची/दस्तऐवजांची कुठलीही माहिती मनपा कडे उपलब्ध नसल्याचे कळविले आहे. यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे यासंदर्भातील कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झालेले असून मनपा च्या तगररचना विभागाने मात्र शहर विकास आराखड्यातील काही नकाशे उपलब्ध करून दिलेले आहेत त्यात सदरचा भूभाग सन
१९५८ साली समाविष्ट करून तयार करण्यात आलेला हद्दवाढीचा नकाशा असून त्यास एक्सीड कॅन्टोन्मेंट लैंड (EXCISED CANTONMENT LAND) व डिफेन्स लैंड (DEFENCE LAND) असे संबोधले आहे. यातून सदरचा भूभाग अहमदनगर कॅन्टोनमेंट कडून तत्कालीन अहमदनगर नगरपरिषदेकडे कायदेशीर प्रक्रिया करून हस्तांतरित करण्यात आल्याचे सिद्ध होत नाही. तसेच यासंदर्भात अहमदनगर कॅन्टोनमेंट कडे सदरच्या भूभागाच्या हस्तांतरण संदर्भात कागदपत्रांची माहिती विचारण्यात आली असता त्यांचेकडे देखील याची कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. याचा अर्थ तत्कालीन नगरपरिषद व विद्यमान महानगरपालिका प्रशासन हे सन १९५८ पासून बेकायदेशीर पणे सदरचा भूभाग मनपा हद्दीत दर्शवून त्याचा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभागरचनेत समावेश करून निवडणूक घेत आलेले आहेत त्याठिकाणी नागरी सुविधा पुरवीत असून राज्य शासनच व मनपा चा मोठा निधी याठिकाणी खर्च केला गेलेला आहे.

याच परिसरातील मोठ्या प्रमाणातील जमीन केंद्र शासनच्या (डिफेन्स ईस्टेट ऑफिस) अखत्यारीत असून त्यावर रामवाडी, कोठला, कैम्प कौलारू नामक झोपडपट्टी आहेत या झोपडपट्ट्यामध्ये नागरी सुधारणांसाठी राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत परंतू सदरच्या झोपडप‌ट्ट्याची जमीन हि राज्य शासनाची नसल्याने किंवा राज्य सरकार किंवा मनपा कडे हस्तांतरित झालेली नसल्याने त्या झोपडपट्ट्या राज्य शासनाकडून घोषित होऊ शकलेल्या नाहीत त्यामुळे राज्य शासनास याठिकाणी विविध योजनांचा निधी वापरता येत नाही व त्यासाठी मनपा सदरची जमीन हस्तांतरित करून मिळावी म्हणून डिफेन्स ईस्टेट ऑफिस व केंद्र सरकारसोबत वारंवार पत्रव्यवहार करीत आहेत परंतु आद्यपही सदरची जमीन मनपा कडे हस्तांतरित झालेली नाही. यासंबंधीचा पत्रव्यवहार च्या प्रती सोबत जोडल्या आहेत. ६) वर नमूद भूभाग हा आजही अहिल्यानगर मनपा कडे हस्तांतरित झालेला नाही याचा पुरावा म्हणजे सदरच्या भूभागाचे कुठलेही जमिनीसंबंधीचे रेकॉर्ड महानगरपालिका, राज्य सरकाराच्या महसूल तसेच भूमी अभिलेख विभागाकडे उपलब्ध नाही, तसेच या भूभागाची शासकीय मोजणी आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे या परिसरातील ज्या जमिनी खासगी आहेत त्यांचे राज्य शासनकडील महसूल किंवा सिटी सर्व्हे विभागाकडील ७/१२ उतारा किंवा सिटी सव्र्व्हे चे मालमत्ता पत्रक उपलब्ध नाही. येथील लोकांकडे मात्र खरेदी खताचा दस्त हे एकमेव कागदपत्र आहे परंतु त्यातून मालकी हक्क प्रस्थापित होत नाही हि येथील लोकांची अडचण आहे. अहमदनगर मनपा स्थापने वेळी येथील बुरूडगाव ग्रामपंचायत बरखास्त करून मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आलेली होती त्यानुसार तिथे मनपा निवडणूक देखील घेण्यात आली होती. कालांतराने सदर ग्रामपंचायत पुन्हा मनपा हद्दीतून वगळण्यात आली व सदरचा परिसर मनपा हद्दीतून वगळण्यात आला आता सदरचा परिसर प्रभाग रचनेत समाविष्ट केला जात नाही. याठिकाणी देखील वर नमूद केलेप्रमाणे अहमदनगर कॅन्टोन्मेंटचा/संरक्षण विभागाचा परिसर/भूभाग कायदेशीर प्रक्रिया होऊन वगळण्याचे आलेलाच नसतांना, मनपा त्या परिसराचा समावेश मनपा निवडणुकीच्या प्रभाग रचनेत करू शकत नाही. सदरचा भुभाग हा आजही केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असून त्याचे नियंत्रण हे पुणे येथील डिफेन्स ईस्टेट विभागाकडून होत आहे त्यामुळेच सदरचा भूभाग हा आजही महानगरपालिकेच्या हद्दीत अधिकृतपणे समाविष्ट झालेला नसून सदर भूभाग हा अधिकृतपणे अहमदनगर कैन्टोनमेंट व संरक्षण च्या हद्दीतील व त्यांचे अखत्यारीत आहे. त्यामुळे सदरचा भूभाग हा अहिल्यानगर मनपा च्या प्रभाग रचनेत समाविष्ट करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे सदरचा अहमदनगर कॅन्टोन्मेंटचा / संरक्षण विभागाचा भूभाग प्रभाग क्र. २,३,५,१० व १३ च्या रचनेतून वगळण्यात यावा व सदरचा भूभाग वगळून नव्याने प्रभाग रचना करण्यात यावी अशी मागणी निलेश म्हसे पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version