HomeUncategorizedनवीन मतदान नोंदणी अभियानास शहरातील प्रभाग ६ मधून सुरुवात मतदान नोंदणी ही...

नवीन मतदान नोंदणी अभियानास शहरातील प्रभाग ६ मधून सुरुवात मतदान नोंदणी ही लोकशाहीची पहिली पायरी, नोंदणीसाठी युवक वर्गाला संधी : बाबासाहेब वाकळे

advertisement

अहमदनगर दि.९ जुलै

आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगर परिषद, नगर पालिका, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढणे अतिशय गरजेचे असून १८ वर्षापूढील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळणे महत्त्वाचे आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने प्रभाग ६ मधून मतदान नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आलेली आहे. घरोघरी जाऊन ही नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार असून याच धरतीवर संपूर्ण अहमदनगर लोकसभा मतदार संघात अशा प्रकारचे अभियान राबविण्यात येणार आहे.

या प्रसंगी वाकळे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हा सगळ्यात मोठा अधिकार आहे. मतदान केल्याने आपणास योग्य व्यक्तीची निवड करता येते. १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना त्यांचे नाव मतदान यादीत नोंदविण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी १ जानेवारीला वयाच्या १८ वर्षे पूर्ण असल्याचा पात्रतेची प्रतिक्षा करण्याची गरज नाही. यापुढे दर तिमाही मतदार यादया अद्यावत केल्या जाणार आहे. यामुळे युवक- युवतींना मतदान नोंदणी करणे सोपे होणार आहे. याच अनुषंगाने माजी महापौर तथा भाजपाचे अहमदनगर लोकसभा निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे यांनी लोकसभा मतदार संघातील जनतेला मतदान नोंदणी करण्यासाठी आवाहन केलेले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular