HomeUncategorizedबालिकाश्रम रोड परिसरामध्ये गुन्हेगारी करणारे व सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यांवर आळा बसवा ...

बालिकाश्रम रोड परिसरामध्ये गुन्हेगारी करणारे व सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यांवर आळा बसवा इंद्रायणी प्रतिष्ठानची तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

advertisement

अहमदनगर दि .९ जुलै:

बालिकाश्रम रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात क्लासेस, अकॅडमी व कॉलेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी झाली आहे. याचबरोबर व्यावसायिकरणही वाढले आहे. तसेच महिला सायंकाळी या परिसरातून जात असताना सोनसाखळी चोरणारे चोर पाळत ठेवून मोठ्या प्रमाणात चोरी करत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनसाखळी चोरीत असताना महिला अक्षरशः रस्त्यावर पडून जखमी होत आहे. याचबरोबर महिला व विद्यार्थिनीची छेडछाड मोठ्या प्रमाणात होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. त्यामुळे हे लोक मोकाटपणे गुन्हे करत फिरत आहे. तरी पोलिसांनी बालिकाश्रम परिसरामध्ये गस्त वाढवावी. बीट मार्शल, डीबी कर्मचारी, दिलासा सेल पथकाने या परिसरामध्ये गस्त घालावी. जेणेकरून गुन्हेगारांवर चाप लागेल. सोनसाखळी चोरणाऱ्या चोरांवर जरब बसवावा अशी मागणी इंद्रायणी प्रतिष्ठानच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.योगेश चिपाडे, अंजली आव्हाड, सुनंदा कांबळे, निर्मला जाधव, सुनीता गुगळे, सुनीता पाचारणे, शितल गाडे, दीपक खेडकर, राजू कोकणे, गौरव जाधव, किरण पंधाडे, मनोज सुडके, आशिष भगत, महेश सुडके, राजेश भालेराव, बाळू पतंगे, आदी उपस्थित होते.

बालिकाश्रम रस्त्यावर मॉर्निंग वॉककरीता प्रिती गाडेकर ही महिला घराबाहेर पडली असता या महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळे सोन्याचे गंठन दुचाकी वरून आलेल्या चोरट्याने जबरदस्तीने चोरून नेले. बालिकाश्रम रस्त्यावर गायकवाड मळा परिसरात ही घटना घडली. गाडेकर यांच्या गळ्यातील 16ग्रामचे सोन्याचे गंठन ओरबाडून धूम ठोकली दरम्यान प्रीती यांनी आरडाओरडा केला असता स्थानिक नागरिक जमा झाले. तोपर्यंत चोर दुचाकीवरून पसार झाले होते याप्रकरणी प्रीती गाडेकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा CCTV कॅमेरामधे केद झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. तरी सदर चोरटयाचा शोध लवकरात लवकर घेऊन संबंधीतांना त्यांचा ऐवज मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली.

 बालिकाश्रम परिसरामध्ये तातडीने गस्त वाढविण्यात येईल, याचबरोबर नागरिकांनी सतर्क राहून 112 नंबरवर फोन करा. तातडीने गुन्हेगारांना पकडण्यास मदत होईल. याचबरोबर या परिसरातील व्यावसायिकांनी एकत्र येऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसावावे. जेणेकरून गुन्हेगारांना चाप बसेल. पोलीस सक्षमपणे काम करत असून नागरिकांना संरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे अशी माहिती शिष्टमंडळात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular