अहिल्यानगर दिनांक 27 डिसेंबर
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महायुती मध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने
प्रभाग क्रमांक 14 (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या गटातून मळू गाडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मात्र अद्यापही महायुतीचा घोषणा झालेली नसल्याने भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना कोणत्या प्रभागावर आपला दावा सांगणार हे अस्पष्ट असून उमेदवार अर्ज भरत असले तरी पक्षाचा एबी फॉर्म भरल्यानंतरच तो अधिकृत पक्षाचा उमेदवार होणार आहे.