अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात असून आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेषता महायुतीमधून शिवसेना बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने उमेदवारी देण्यासाठी आज दिवसभर धावपळ केल्याचा दिसून आले. अनेक उमेदवार शिवसेनेला मिळाले असल्यामुळे आता ही निवडणूक चांगली रंगात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा विरुद्ध शिवसेना,महाविकास आघाडी आणि मनसे अशी ही निवडणूक होणार आहे. कारण महाविकास आघाडी मधून मनसे सुद्धा बाहेर पडली असून मनसे आता स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार देण्यात आले असून शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी पुरुषांच्या जागी महिला उमेदवार देण्याचा निर्णय झाल्यामुळे मोठी तारांबळ उडाली होती गौरी अजिंक्य बोरकर यांना ( क ), ज्योती गाडे आणि उषा नलवडे यांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या युती मधून अधिकृत उमेदवार म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने योगीराज गाडे ,डॉ नीलम विपुल वाखुरे ,केतन क्षीरसागर ,अनिता प्रशांत दारकुंडे
शिवसेना शिंदे गट शेळके चंद्रकांत सुर्यभान,खरमाळे संगिता , वाखुरे स्वप्नजा ,शेलार नितीन शिवाजी आणि काँग्रेस कडून आशिष रमेश ढेपे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
