HomeUncategorizedचार राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसची एक्झिट.. एक्झिट पोलचे दावे फेल.. भाजपची विजयी घौडदौड...

चार राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसची एक्झिट.. एक्झिट पोलचे दावे फेल.. भाजपची विजयी घौडदौड सुरूच… लोकसभा निवडणुका आधी सेमी फायनल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पास… फायनल लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिष्मा कायम राहणार..

advertisement

अहमदनगर दि.३ डिसेंबर
देशामध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात सुरू असून लोकसभा निवडणुकीआधी पाच राज्यातील निवडणुका ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेमी फायनल मॅच होती या सेमी फायनल मॅच मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जनतेच्या माध्यमातून लोकसभेच्या फायनल मॅच मध्ये निश्चित विजय मिळवतील असा स्कोर चार राज्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने दिला आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश,छत्तीसगड,मिझोरम आणि तेलंगणा या राज्यात निवडणुका झाल्यानंतर विविध वृत्तवाहिनी आणि संस्थांनी केलेल्या संरक्षणानुसार एक्झिट पोल मध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणात आघाडीवर असल्याचे चित्र सांगितलं जात होतं मात्र तेलंगणा वगळता काँग्रेसची जादू कुठेच चालली नाही हे आता निकालावरून स्पष्ट झाले आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी टक्कर दाखवली जात होती मात्र त्या ठिकाणी सुद्धा भाजपने एक हाती सत्ता मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते त्या ठिकाणी भाजपची जादू चालली असून वसुंधरा राजे या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असणार आहेत. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होती या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला असून भाजपने या ठिकाणी बाजी मारली आहे.मध्य प्रदेशात सीएम शिवराज सिंह चौहान यांची जादू पुन्हा एकदा चालली असून भाजपने विजयाची गरोदर कायम ठेवली आहे तेलंगणात सीएम केसीआर यांच्या नेतृत्वाखाली बीआरएस यांच्या सरकारला जनतेने चांगलीच धोबीपछाड दिली असून या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली तर भाजप दोन नंबर वर आणि केसीआर यांचा पक्ष थेट तीन नंबर वर पोहोचल्याचे पाहायला मिळतेय. एकंदरीत पाहता एक्झिट पोलचा निकाल खोटा आला असून विजयाची घौडदौड मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिले आहे. एकीकडे काँग्रेस आणि विरोधी पक्ष महागाई, भ्रष्टाचार, आणि देशात सुरू असलेल्या ईडीच्या करावाई वरून टीका करत होती.राहुल गांधी यांनी काढलेले पदयात्रा यामुळे कुठेतरी या निवडणुकीत भाजपचा मोठ्या फरकाने पराभव होईल असे वाटत असतानाच भाजपची ताकत दुपटीने वाढली आहे.जनतेच्या मनात भाजप असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

काही तांत्रिक कारणामुळे मिझोरम राज्याची मतमोजणी ही उद्या होणार असून त्या ठिकाणी सीएम झोरमथांगा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्याने एमएनएफ सरकार अस्तित्वात आहे त्यामुळे आता या ठिकाणी भाजप पुन्हा बाजी मारणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular