अहमदनगर दि.९ डिसेंबर
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत शुक्रवारी त्यांना भेटण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे घनश्याम शेलार आदींनी आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला.
यावेळी बोलताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की उपोषणास बसलेले तरुण आमदार आहे तालुक्याचे काम करणारा सर्वसामान्य मध्ये रमलेला आणि त्याचे प्रश्न सोडवणार आमदार आहेत कोरोनाच्या काळातलं त्यांचं कांम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. जनतेचे जिथे प्रश्न असतील तिथे जाऊन ते प्रश्न सोडवण्याचा हा प्रयत्न त्यांचा सातत्याने असतो आणि त्याच भावनेतून दोन प्रश्न त्यांच्यापुढे आले ते म्हणजे पाथर्डी नगर, नगर शिर्डी या रोडचे भयानक स्वरूप असून अपघातात मृतांचे आकडे 467आणि 200 च्या वर गेला हे फार भयानक सत्य आहे. रोज प्रवासात माणसं मारतात आणि या प्रश्ना वर कुठेतरी आवाज उठवण्याचं काम निलेश लंके करत आहेत.
एखादा लोकप्रतिनिधी उपोषणास बसतो तेव्हा तो प्रश्न समजून घेणे आणि मार्ग काढणं पाठिंबा देणे ही जबाबदारी पालकमंत्र्यांची म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटलांची जबाबदारी आहे मात्र त्यांनी जबाबदारी टाळली आहे. या ठिकाणी उपोषणास बसलेले कोणत्या पक्षाचे आहेत हे पाहण्याची गरज नाहीये पालक याचा अर्थ सगळ्यांचा पालक तिकडे राज्यपाल इकडे हे पालकमंत्री असा टोलाही त्यांनी लगावला.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या दहशतवाद सुरू असून जिरवा जिरविचे राजकारण सुरू असल्याच माजी मंत्ती बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे . सरकार विरोधात कोणी आंदोलन उपोषण केले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात एवढेच नव्हे तर जे कोणी त्यांचे दुश्मन असतील त्यांचेही नावे नंतर केस मध्ये टाकले जातात अशी ही माहिती आता समोर येते. आता सर्वांनी मिळून त्याच्या विरोधात उतरले पाहिजे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखे चांगले लोक मंत्री असताना त्यांच्याकडे जाऊन हा प्रश्न सोडवणे गरजेचा होता मात्र खासदार, मंत्री पद असूनही त्याचा उपयोग करता आला नाही असा टोलाही त्यांनी खासदार विखे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला.
या सर्व दहशतवाद विरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज असून निलेश लंके यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत मात्र त्यांनी उपोषण सोडून या दहशतवाद विरोधात सर्व सामान्य जनतेला घेऊन उतरावे असावं नाही त्यांनी केलं