अहमदनगर दि.३० जुलै
अहमदनगर शहरातून बेपत्ता झालेल्या निवृत्त लष्करी जवानाचा मृतदेह लोणी येथे सापडल्याची खळबळ घटना उघडकीस आले असून 29 तारखेला हा जवान घरातून निघाल्यानंतर परत आला नसल्याने त्याच्या पत्नीने तोफखाना पोलीस स्टेशनला आपला पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
बोलेगाव गणेश चौक येथे राहणाऱ्या सुरेखा भोर यांनी आपले पती निवृत्त लष्करी जवान असलेले विठ्ठल भोर हे सापडत नसल्याची तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल केली होती 27 तारखेला दुपारी चार नंतर त्यांचा फोन लागत नसून ते घरी आले नसल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी दोन पथके रवाना केली होती. मात्र त्यांचा मोबाईलही बंद असल्याने त्यांचा ठाव ठिकाणा समजत नव्हता आज दुपारी विठ्ठल भोर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोणी तळेगाव रोडचा बाजूला गोगलगाव हद्दीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.