Homeक्राईमअवेज आणि कैफ मुलींचा पाठलाग करून करत होते छेडछाड तर त्यांचे इतर...

अवेज आणि कैफ मुलींचा पाठलाग करून करत होते छेडछाड तर त्यांचे इतर साथीदार धर्मांतरासाठी टाकत होते अल्पवयीन मुलींवर दबाव.. खाजगी शिकवणीच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रयत्न.. अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

advertisement

अहमदनगर दि.३१ जुलै
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून धर्मांतर करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे बदनामी करण्याचे धमकी देऊन मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा हादरून गेला असून याप्रकरणी आता नऊ जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .उंबरे या एकाच गावातील मुलींनी गेल्या चार दिवसात तीन गुन्हे दाखल केल्याने या घटनेचे गंभीर्य किती आहे हे लक्षात येते.


या प्रकरणातील फिर्यादी मुली या हिना शेख हिच्याकडे खाजगी शिकवण्यासाठी येत होत्या शिकवणीसाठी गेल्यावर अवेज शेख आणि कैफ शेख दोघे वारंवार पाठलाग करून मुलींना आडवीत होते आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत होते मैत्री लग्न व धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकीत होते इतर आरोपी त्यांना साथ देऊन प्रवृत्त करत होते व फोटो काढून सोशल मीडियाद्वारे व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत होते अशा प्रकारच्या तक्रारी वरून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल झाले आहेत.

राहुरी पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत नऊ जणांवर गुन्हे दाखल असून सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये अल्ताफ बाबूलाल शेख, कैफ जिलानी शेख, शाकीर यासीन सय्यद,हिना मुस्ताक पठाण, सलीम पठाण, सोहेल शेख आणि अवेज निसार शेख असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून तसेच यामधील हुसेन उर्फ भैय्या शेख अद्याप फरारी आहे. तर आवेज शेख अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular