अहिल्यानगर दिनांक 6 एप्रिल
ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. अरुण काका जगताप यांना त्रास होत असल्याने त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात शनिवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून दिली गेली असून नगर शहरांमध्ये काही अफवा पसरल्या आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.