पुणे दिनांक 6 एप्रिल
अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांची प्रकृती स्थिर असून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल येथे अति दक्षता विभागात तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यामुळे कोणालाही अरुण काकांना भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येणे येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले आहे.
ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत कोणीही त्यांना भेटण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन दवाखाना प्रशासनाने केले आहे.