Home शहर शॉर्ट सर्किट मुळे आग पंक्चर दुकान जळून खाक गुलमोहर रोड वरील घटना

शॉर्ट सर्किट मुळे आग पंक्चर दुकान जळून खाक गुलमोहर रोड वरील घटना

अहमदनगर दि.१२ नोहेंबर

अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात मर्चंट बँक समोरील चारचाकी दुचाकी पंक्चर काढणाऱ्या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या दिवशी ही आग लागली असून शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी येऊन आग विझवल्याने पुढील अनर्थ टाळला कारण या दुकानात हवा भरण्याचे मोठे कॉम्प्रेसर असल्याने त्याचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता तसेच दुकानाच्या आजूबाजूला रहिवासी परिसर आणि काही दुकाने असल्यामुळे ही आग जर मोठ्या प्रमाणात लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता मात्र अग्निशामक दलाने वेळीच पोहचून ही आग विझवण्यात यश मिळवले आहे. मात्र दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग लागल्याची माहिती कळतात माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर तातडीने घटनास्थळी पोहचले होते.तसेच अग्निशामक दलाला माहिती कळवली अग्निशामक दल वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टाळला

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version