जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
आ . रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यात विविध कार्यक्रमासाठी आले असता .आमदार राम शिंदे यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन म्हणाले की 2024 ला बारामतीत भाजपचाच खासदार राहिल पत्रकारांनी छेडलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना आ. रोहित पवार म्हणाले की त्यांनी अहंकार दाखवत मला आव्हान दिले होते मी लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर त्यांचे आव्हान स्वीकारले होते त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो तुम्ही अगोदर आज आमदारकीचा राजीनामा द्यावा व उद्या मी राजीनामा देईल या माझ्या आव्हानावर त्यांनी शब्द काढला नाही. त्यांनी अगोदर याच्यावर बोलावे नंतर बारामती लोकसभा मतदारसंघावर बोलावे अशी खोचक टिका आ. रोहीत पवार यांनी आ. राम शिंदे यांनी बारामती लोकसभा संदर्भात केलेल्या टिपण्णीवर केली आहे.
आ. रोहीत पवार हे तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी आ. रोहीत पवार बोलत होते. वेदांता-फॉक्सकॉनवरुन राज्यातील युवांना नोकरी मिळणार नाही यावर आमदार रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांताबाबत सगळ्या गोष्टी फायनल झाल्या होत्या. यामध्ये तळेगावची जागा टॅक्स बेनिफिट आणि इतर सर्व गोष्टी फायनल झाली असताना ५ सप्टेंबरला वेदांताचे प्रमुख अग्रवाल हे पंतप्रधान यांना भेटले आणि त्यानंतर सर्वच गोष्टी बदलायला लागल्या. कदाचित या सरकारने देखील प्रयत्न केलेले असतील पण ते पुरेसे ठरले नाही. महाराष्ट्रात जागा निश्चिती केली असतानाही राजकीय उदासिनतेमुळे गुजरातमध्ये गेलेला हा उद्योग अजूनही तिकडं जागेचा शोध घेतोय…हे म्हणजे एकीकडं जेवण तयार असतानाही त्याकडं दुर्लक्ष करुन दुसरीकडं जेवण बनवण्यासाठी लाकूडफाटा जमा करण्यासारखा प्रकार आहे.”वेदांता-फॉक्सकॉनवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राज्यातील युवांना नोकरी मिळणार नाही. त्यामुळं डबल इंजिनचा प्रचार करणाऱ्या राज्य सरकारने हा उद्योग महाराष्ट्रातच झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडं आग्रह धरावा, ही विनंती!” असेही आ. रोहीत पवार म्हणाले.
जामखेड तालुक्यात अनेक लोकांना घरकुल मंजुर झाले त्यासाठी आपण महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत व जामखेड मधील घरकुल धारकांसाठी राज्याचा पैशाचा जो हिस्सा होता तो मंजूर करून आणला होता पण केंद्राचा हिस्सा अद्याप मिळाला नाही तो केंद्राकडे प्रयत्न करून आणावा लागेल पण जागा नसल्याने जे घरकुल दिव्यांग व सर्व सामान्य लोकांचे होऊ शकत नाही यासाठी आपण कर्जत येथे सहा हजार घरकुल धारकांना जागा व घरे देण्यासाठी जे प्रयत्न केले त्याच धर्तीवर जामखेड येथे प्रयत्न करू असे आ. रोहीत पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.