Home क्राईम भोळसर वडील आणि वयोवृद्ध आईचा फायदा घेत मुलीने गावाकडील जमीन केली स्वतःच्या...

भोळसर वडील आणि वयोवृद्ध आईचा फायदा घेत मुलीने गावाकडील जमीन केली स्वतःच्या नावावर. आई वडील जाब विचारला गेले तेव्हा जावयाने केली सासू सासऱ्यास मारहाण.. कलयुगात कोण कोणाचे नाही..

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक 8 ऑगस्ट

अहिल्यानगर शहारात राहणाऱ्या अहमद शेख या वयोवृद्ध शेतकऱ्याची शेत 47 गुंठे शेत जमीन शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे आहे. अहमद शेख हे वयोवृद्ध आणि भोळसर असल्याने ते नगर शहरातील गजराज नगर भागात मुलगा युनूस याच्याकडे राहतात त्यांची पत्नी आणि ते मुलगा मोलमजुरी करून आयुष्य जगत असताना.त्यांच्या शेत जमिनीवर त्यांच्याच मुलीने आणि जावयाने बेकायदेशीरपने ताबा मारला असून अहमद शेख यांच्या भोळसर पणाचा फायदा घेऊन फसवून त्यांच्या मुलीने आणि जावयाने शेत जमीन आपल्या नावावर करून घेतले आहे. याबाबत न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.
अहमद शेख यांची मुलगी सोफिया फिरोज शेख हिने 2023 मध्ये आपले आई वडील म्हणजेच अहमद शेख आणि त्यांच्या पत्नीला शेवगाव येथे बोलून घेतले होते आपल्या पडीत जमिनीचे शासकीय अनुदान येत नाही व पिक विमा येत नाही ते चालू करण्याकरीता विविध कागदांवर अंगठ्याचे ठसे घेण्यात आले होते त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन काही ठिकाणी फोटो आणि अंगठे घेऊन मुलीने आणि तिच्या पतीने सदर शेत जमीन फसवून आपल्या नावावर करून घेतली होती. मात्र वयोवृद्ध आणि भोळसर असलेल्या अहमद शेख आणि त्यांच्या पत्नीला या बाबत काहीच कल्पना नव्हती आपल्याला पीक विमा अनुदान मिळेल या आशेने त्यांनी आपल्या मुलीने आणि जावई सांगितलेल्या कागदांवर अंगठे दिले होते.

Oplus_131072

जेव्हा अहमद शेख यांचा मुलगा युनूस हा त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक कामाकरता मिळकतीचा उतारा काढण्यासाठी गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला कारण त्यांच्या शेत जमिनीच्या उताऱ्यावरून त्यांचे नाव कमी झाले होते तर त्या ऐवजी अहमद शेख यांची मुलगी सोफिया फिरोज शेख यांचे नाव सातबारा उतारा वर लावण्यात आले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर युनूस याने आपले वडील अहमद शेख आणि आई साबेरा हिला याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनाही ही गोष्ट माहित नव्हती मात्र काही कालावधी आधी पिक विमा मिळेल म्हणून मुलीने आपल्याला सरकारी कार्यालयात घेऊन जाऊन काही कागदांवर अंगठे घेतले असल्याचे आई-वडिलांनी आपला मुलगा युनूस याला सांगितले .

फसवण्याची सर्व हकीगत लक्षात आल्यानंतर अखेर युनूस शेख याने आपल्या आई वडिलांच्या नावाने न्यायालयात अर्ज दाखल करून न्यायालयासमोर सर्व हकीगत लक्षात आणून दिली.या वर न्यायालयात तथाकथीत खरेदीखत रद्द करुन मिळणेसाठी दावा दाखल केलेला असून त्यामध् केलेला असून त्यामध्ये दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून न्यायालयाने सोफिया सलाउद्दीन शेख यांना अहमद शेख यांच्या शेत जमिनी मध्ये घुसू नये, अतिक्रमण करूं नये तसेच मिळकतीचे कोणासही कोणत्याही प्रकारे हस्तांतर करु नये, मिळकतीचे स्वरुपात फेरबदल, त्रयस्त इसमांचे हक्क, हितसंबंध, बोजे निर्माण करु नये असा मनाई हुकुम दि.01/10/2024 रोजी दिला असूनही सोफिया आणि तिचा पती शेत जमिनीमध्ये घुसून शेती करत आहेत आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेही लेखी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून या सर्व प्रकारचा राग अहमद शेख यांच्या मुलीचा पती फिरोज शेख याला आल्याने त्याने 31 जुलै रोजी नगर येथे येऊन आपले सासरे सासू यांना जबर मारहाण केली असून या मध्ये अहमद शेख हे गंभीर जखमी झाले होते. या बाबतही अहमद शेख यांची सून हुमेरा युनूस शेख यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिरोज सलाउद्दीन शेख व सर्फराज सलाउद्दीन शेख यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेत जमिनीच्या लालसेपोटी मुलीनेच आपल्या आई, वडील, भावाला फसवण्याचा हा प्रकार असून भोळसर आई-वडिलांना शेतीचे अनुदान व पिक विमा येत नाही तो मिळवून देण्याच्या बहाण्याने थेट शेत जमिनीत आपल्या नावावर करून हा घेण्याचा प्रकार उघडकीस आलाआहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version