अहमदनगर दि. 3 ऑगस्ट
कमी श्रमात शॉर्टकट मारून लवकर श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजण जुगार आणि ऑनलाईन गेम च्या माध्यमातून दिवाळखोर होत आहेत. अहमदनगर शहरात नुकतीच एक घटना घडली असून तासभरात 45 लाख रुपये पत्त्याच्या जुगारात एक तरुण हरला आहे. विशेष म्हणजे हा जुगार नगर शहरातील नगर मनमाड रोड वरील एका मोठ्या हॉटेलमध्ये सुरू होता.
सर्वच माणसांना पैसा कमवून आपले घर संसार गाड्या सोने घेण्याची स्वप्न असतात मात्र सुखी संसाराला पैसा लागतो किती असे म्हणणारे फार कमी असतात. मात्र झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकजण शॉर्टकटचा वापर करतात आणि या शॉर्टकट मुळेच अनेक जण दिवाळीखोर होत जातात. तसाच काहीसा प्रकार नगर शहरात घडला असून एका तरुणाने शॉर्टकट मध्ये पैसे कामासाठी पत्त्यांच्या जुगारात तासभरात 45 लाख रुपये हरले आहेत.
नगर शहरात अवैध धंदे सुरूच आहेत मात्र व्हाईट कॉलर असणारे जुगारी मोठमोठे हॉटेलच्या रूम्स बुक करून तेथे ठराविक लोक बोलून जुगार खेळत बसतात हा प्रकार नवीन नाही कारण पोलिसांची रेड पाडण्याची भीतीही नसते आणि कोणाला समजत नाही यामुळे अनेक व्हाईट कॉलर लोक मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जुगार खेळण्याचा आनंद लुटतात मात्र याच जुगारापाई आणि कमी श्रमात जास्त पैशाच्या मोहापाई अनेक तरुण दिवाळखोरीत जातात हेही तेवढेच सत्य आहे.