Home शहर गंगा उद्यान जवळील मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावावर गणपती विसर्जनासाठी भाविकांची...

गंगा उद्यान जवळील मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावावर गणपती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केले भक्तांचे स्वागत

अहमदनगर दि.८ सप्टेंबर

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या….या गजरात नगर शहरात ठिकठिकाणी गणपती विसर्जन सुरू असून नालेगाव येथील बाळाजी बुवा विहीर तसेच विविध ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावावर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तर नगर शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपतीची सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते संपत्ती पूजा करण्यात आली असून विशाल गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे.

सावेडी उपनगर मध्ये गंगा उद्यान जवळ महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कृत्रिम गणपती विसर्जन तलावावर सकाळ पासूनच उपनगरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन सुरू आहे. माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर स्वतः या ठिकाणी सर्व आलेल्या गणेश भक्तांचे स्वागत करत आहेत.

या ठिकाणी मोठा कृत्रिम तलाव गणपती विसर्जनासाठी करण्यात आला असून त्याचबरोबर निर्मल्य टाकण्यासाठी वेगळा कलश उभा करण्यात आला आहे. त्यामुळे विसर्जन करण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी खराब होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून अजिंक्य युवा प्रत्येकांचे सर्व कार्यकर्ते संजय जाधवर,संदीप चौधरी, अमोल जाधव, राहुल जाधव ,प्रकाश दरेकर ,वैभव झोटिंग, प्रयास कांबळे, यांच्या सह मनपाचे कर्मचारी भाविकांचे स्वागत आणि गणपती विसर्जनासाठी मदत करत होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version