अहमदनगर दि.१४ सप्टेंबर
अहमदनगर शहरामध्ये काही परिसरामध्ये गणपती उत्सवात मंडप लावण्या वरून आणि थेट गणपती बाप्पाचे मंडळ कोणाचे यावरून चांगलेच वाद सुरू आहेत हे वाद थेट आता पोलीस दरबारी गेल्याने नगर शहरात काहीही होऊ शकते हे यावरून सिद्ध झाले आहे.
अहमदनगर शहरातील दाळ मंडई येथील भारत सहकार मित्र मंडळाच्या मालकीचा वाद आता थेट पोलिसांमध्ये पोहोचला आहे याबाबत करण सुनिल डापसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एक तक्रार अर्ज दिला असून या तक्रार अर्जामध्ये ते बसवत असलेल्या गणपती मंडळाच्या जागी काही इतर लोक गणपती बसवण्याचा अट्टहास करत असून याबाबत त्यांना दमदाटी होत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रार अर्जात करण्यात आलेली आहे.
भारत सहकार मित्र मंडळ हे गेल्या मागील 15 वर्षांपासुन सामाजिक कार्य, पारंपारीक कार्य करत आलेलो आहे आज पर्यंत कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.तरी आम्ही गेल्या काही वर्षांपासुन सालाबादाप्रमाणे जेथे गणपती बसवतो त्याच ठिकाणी आडते बाजार युवक मंडळाचे अनिल गट्टानी यांना सुध्दा त्याच ठिकाणी गणपती बसवायचा आहे. तरी सदर मंडळाचे अनिल पांडुरंग गट्टानी, सागर मुर्तडकर, श्रीकांत मुर्तडकर, शुभम गंगेकर,
गोपाल मालपानी, निकेतन खटोड, रोहन अनिल गटटाणी, सचिन दिवटे, निकीत मुकुंददास खटोड,
मोहित खटोड व त्यांचे साथीदार हे आमच्यावर दमदाटी करत आहेत व आम्हांला धमकी देत आहे की
तुम्ही सदर चौकामध्ये गणपती बसवायचा नाही. अशा प्रकारची तक्रार करण सुनील डापसे यांनी दिले असून आता पोलीस याकडे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
याचप्रमाणे नगर शहरातील स्वस्तिक चौक आणि झोपडी कॅन्टीन परिसरातही अशाच प्रकारचा मंडळाच्या जागेच्या प्रश्नावरून वाद सुरू झाले आहेत. त्यामुळे यावर्षी गणपती बसवण्यावरून सुद्धा वाद सुरू झाले असून मंडळांच्या जागेवरही ताबा मारण्याचा प्रकार सुरू झाला आहे का? अशी चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहे.