अहमदनगर दि.१५ सप्टेंबर
राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले होते आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी मधील काही नेते सत्ताधारी पक्षात गेल्यामुळे राष्ट्रवादीमध्येही सध्या दोन गट असून आता याचा थेट परिणाम गणपती उत्सवावर झाला आहे अहमदनगर शहरात या गटांमुळे आता एकाच मंडळाची दोन मंडळ होऊ लागली आहेत तर काही ठिकाणी मंडळातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्यामुळे जागेवरूनही वाद होऊ लागले आहेत.
अहमदनगर शहरातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांचे गेल्या 35 वर्षांपासून गणपती उत्सव मंडळ आहे मात्र महानगरपालिका प्रशासन देणे त्यांच्या मंडळाला परवानगी नाकारून एक वर्षापूर्वीच्या मंडळास परवानगी दिल्याने शिवसेनेचे दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तसेच काँग्रेस आणि भाजप यांच्या वतीने महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना घेराव घालून ठिय्या देण्यात आला. तर राजकीय वरदहस्त असलेल्या त्या ताबा मारणाच्या गणेश मंडळाला हटवून जनजागृती मित्र मंडळाला परवानगी देण्यासाठी आयुक्तां समोर गणपतीची आरती करण्यात आली. आयुक्त साहेब परवानगी द्या या घोषणांनी महापालिका दणाणून गेली होती.
शहरामध्ये सध्या राजकीय दबाव टाकून एका मंडळाचे दोन मंडळ करून घराघरात भांडणे लावण्याचे प्रकार शहरात सुरू असल्याचा आरोप माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केलाय
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, भाजपचे अभय आगरकर, सचिन जाधव,पै. सुभाष लोंढे, महेश लोंढे,गुंदेचा, गौरव ढोणे, बंटी ढापसे, ओंकार शिंदे, आशिष (मुन्ना) शिंदे आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.