अहमदनगर दि.२१ नोव्हेंबर
निसर्गनियमांचा अभ्यास करून निसर्गातील अनेक रहस्य उलगडण्याचा प्रयत्न जे शास्त्र करते, तेच विज्ञान होय. आज विज्ञानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या विज्ञानाच्या आधारे माणसाने आपल्या स्वतःच्या अक्कल हुशारीने निसर्गनियमांना डावलून विविध प्रकारचे प्रयोग केले. नैसर्गिक जीवन जगण्याऐवजी कृत्रिम जीवन जगण्याकडे माणसाचा कल वाढत गेला. अधिक सुखी होण्यासाठी अधिक भौतिक वस्तूंची आवश्यकता माणसाला वाटू लागली. ‘जेवढी भौतिक साधने अधिक तेवढे सुख अधिक’, असे एक नवे समीकरण माणसानेच निर्माण केले. या समीकरणाच्या आहारी जाऊन माणसाने निसर्गनियमांकडे पाठ फिरवली. परिणामी आजची भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
माणसाला भौतिक सुख प्राप्त झाले मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मात्र बिघडले. मानव अधिकाधिक विकृतीकडे वळू लागला. विकृतीच माणसाला संस्कृती वाटू लागलीय अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे अहमदनगर मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून एक अल्पवयीन मुलगा घरातून बेपत्ता झाला होता शाळेला जातो म्हणून घरातून गेलेला मुलगा परतलाच नाही. पोलिसांकडे याची नोंद झाल्यानंतर त्याचा तपास सुरू होता. पोलिसांच्या तपासात आता याबाबत आता धक्कादायक माहिती मिळाली असून. एका समलैंगिक पुरुषाने या अल्पवयीन मुलाला आपल्या विकृत कल्पनाशक्तीने ब्लॅकमेल केले होते त्यामुळे हा मुलगा घाबरून जाऊन अखेर घरातनं निघून गेला होता.
अहमदनगर शहरात या विकृत माणसाने काही तरुण मुले आणि शालेय विद्यार्थ्यांबरोबर समलैंगिक संबंध ठेवले आणि त्याचे व्हिडिओ काढले आहेत अशीही माहिती समोर आली आहे आणि याद्वारे तो या मुलांना आपल्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी ब्लॅकमेलिंग करतो त्यामुळे अनेक तरून या समलैंगिक पुरुषाच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडले आहेत. डोक्याला गंध लावून हा विकृत समलैंगिक मुले किंवा तरुण सावज शोधून त्यांना आपल्या जाळ्यात ओढतो आणि नंतर समलैंगिक संबंध ठेवतो पोलिसांनी आता या विकृत इसमाला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्याकडून अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर येण्याची शक्यता आहे.
अहमदनगर शहरात समलैंगिक संबंध ठेवण्याचे प्रकार वाढत असून शहरातील तारकपूर परिसरातील गंगा उद्यान शेजारील असलेल्या झाडाझुडपांमध्ये दिवस रात्र हा प्रकार सुरू असतो. रात्री नगर शहरातील सर्व एसटी स्टँड परिसरातही हा प्रकार खुलेआम सुरू असतो या ठिकाणी समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था करून ठेवण्यात आली असून देखरेखी साठी काही लोकही या ठिकाणी रोडवर बसून देखरेख करत असतात.
मात्र या समलैंगिक प्रकारामुळे विकृतीकरण वाढत असून निसर्गचक्र बिघडत चालले आहे. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी हा अधिक श्रेष्ठ आणि बुद्धीजीवी म्हणून ओळखला जातो. मानवाच्या तुलनेत अन्य प्राणी हे अत्यंत कनिष्ठ दर्जाचे आहेत. त्यांचे वर्तन सुद्धा निसर्गाला अनुरूप असेच असते. स्वतःला सुविद्य समजणारा माणूस मात्र निसर्गाच्या नियमांच्या विरोधात वागून स्वतःला अधिक शहाणा आणि पुढारलेला समजतो; पण ‘त्याचे वर्तन हे अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिकच विकृत झाले आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही, म्हणजेच समलिंगी संबंध ठेवण्याचा विचार मानवाच्या मनात ज्या क्षणी येतो, त्या वेळेला तो अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिकच कनिष्ठ आणि विकृत ठरतो. तथापि याचे भान कुणालाही राहिले नाही. विचार आणि विवेक यांवर विकृती कशी मात करते ? आणि संपूर्ण मानवी समाज कसा हतबल होतो ? त्याचे चित्र आज आजूबाजूला पाहिल्यावर दिसते.
पुरुषासारखे दिसणारे पुरुषाने मात्र विकृत असणारे समलैंगिक लोक या समाजात फिरत असतात आणि यामुळे विकृतीकरण जास्तच वाढत चालले आहे.
या विकृत लोकांमुळे मात्र जे पोटापाण्यासाठी फिरणाऱ्या तृतीय पंथीयांचयाची नाहक बदनामी होत आहे.