Homeराजकारणराष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा अध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा अध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची निवड

advertisement

अहमदनगर दि.२२ नोहेंबर
पारनेर तालुका बाजार समितीचे माजी सभापती आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन जबाबदारी सोपवली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे पत्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

पारनेर बाजार समिती तसेच सध्याचे जिल्हा बँकेचे संचालक पद यामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून मधल्या काळात अजित पवार अहमदनगर जिल्हात आले असताना प्रशांत गायकवाड यांचे भर सभेत कौतुक केले होते. त्यामुळे लवकरच त्यांच्यावर अजून काहीतरी नवीन जबाबदारी पडेल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले प्रशांत गायकवाड यांच्यावर पक्षाने चांगल्या जबाबदाऱ्या दिल्या असून प्रशांत गायकवाड यांनी त्या उत्तमरीत्या पार पाडल्या असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता त्यांना पुन्हा ही नवीन जबाबदारी दिली आहे. येणारा काळा निवडणूक असल्याने प्रशांत गायकवाड यांच्यासमोर आता अध्यक्षपदाची जबाबदारी आणि निवडणुका यामुळे चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular