अहमदनगर दि.१३ मार्च
अहमदनगर शहरापासून जवळच आलेल्या गोरक्षनाथ गड या ठिकाणी ट्रेकिंग साठी गेलेल्या डॉक्टरांची चारचाकी गाडी मोठं मोठ्या दगडांनी फोडण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
अहमदनगर शहराजवळ असलेल्या गोरक्षनाथ गड हा उंच असल्याने अहमदनगर शहरातील अनेक नागरिक या ठिकाणी ट्रेकिंग साठी जात असतात तसेच या ठिकाणी दर रविवारी पॅराग्लाइडिंग सुद्धा होत असते डॉक्टर नरेंद्र पाटील आणि डॉक्टर प्रताप पठारे आज गोरक्षनाथ गड येथे ट्रेकिंग साठी गेले असताना गोरक्षनाथ गडाच्या उंच टेकडीवर गाडी लावून ते दरीत उतरले होते त्यानंतर काही तासाने पुन्हा ट्रेकिंग संपल्यानंतर गाडी जवळ आले असता संपूर्ण गाडी मोठमोठ्या दगडांनी फोडलेली आढळून आली गाडीच्या सर्व काचा फोडून टाकण्यात आल्या होत्या विशेष मध्ये या गाडीमधून काही चोरीचा प्रयत्न झाला नाही मात्र त्रास देण्याचा उद्देशाने गाडी फोडण्यात आल्याचे दिसून आले आहे .
गोरक्षनाथ गड या ठिकाणी याधी काही पर्यटकांना आणि या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या तरुणांना काही अज्ञात तरुणांनी लुटण्याचा प्रकार घडला होता मात्र आता अशा प्रकारे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचा प्रकार घडल्यामुळे अहमदनगर शहरातील सर्व ट्रेकिंग प्रेमींनी पर्यावरण प्रेमींनी आणि पॅराग्लाइडिंग क्लब यांनी या घटनेचा निषेध केला असून यामुळे या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी आणि ट्रेकिंग करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे