अहमदनगर दि१४ मार्च
अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात उघडे घर शोधून चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह चोरलेले मोबाईल विक्री करणाऱ्यास मदत करणाऱ्या दोन मोबाईल दुकान चालकांना कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
या बाबत हकीकत अशी की 3 फेब्रुवारी रोजी आगरकरमळा येथील कविता संदिप पांढरपोटे यांच्या घरातून ओपो कंपनीचा ए ३७ मोबाईल फोन व घरात असलेला एक जुना मोबाईल फोन चोरून नेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवली होती त्या अनुषंगाने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तपास सुरू करून माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली एक अल्पवयीन मुलगा उघडे घर शोधून घरातील लोकांची नजर चुकवून मोबाईल चोरून ते मोबाईल केडगाव परिसरात असणाऱ्या जगदंबा मोबाईल शॉपी आणि अस्लम मोबाईल शॉपी यांचेकडे विकण्यासाठी देत असे आणि पुढे हे दोन्ही मोबाईल दुकानदार या मोबाईलचे पार्ट विकून पैसे कमवत असल्याचं समोर आले तर तो सतरा वर्षीय मुलगा मोबाईल विक्री मधून मिळालेल्या पैशातून ऐशोअराम करत असे
पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोसई मनोज कचरे, मपोसई शितल मुगडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अशोक सायकर, अशोक कांबळे, जयश्री सुद्रिक यांनी सापळा लावून अल्पवयीन मुलाला चिरलेला मोबाईल विक्री करताना रंगे हात पकडले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने असे 34 मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली सर्व मोबाईल जगदंबा मोबाईल शॉपी आणि अस्लम मोबाईल शॉपी यांचेकडे विकण्यासाठी दिल्याची माहिती दिली त्या नुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अल्पवयीन मुलाने चोरलेले
०७ सैमसंग ०४ ओप्पो, ०८ विवो, ०१ एलजी, ०४ एमआय, ०२ मोटो, ०१ लिनोवा, ०१ टेक्नो, ०२ रेडमी, १ प्लस एक, ०१ होनर एकुन ३२ मोबाईल फोन व दोन टॅब ०१ समसंग व ०१ लेनोवा असे एकुन ४,७०,०००/- रु असा मुद्देमाल जप्त केला आहे तर या प्रकरणी सतिष रघुनाथ दुबे वय २३ वर्षे रा मोहिनीनगर केडगांवअहमदनगर २) अस्लम मोबाईल शॉपी चालक अस्लम फकीरमोहंमद सय्यद यांना ताब्यात घेतले आहे
ज्या लोकांचे मोबाईल चोरीला गेलेले असतील तर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन ओळख पटवून घेऊन जावेत असे आवाहन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे